25.8 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriजिल्ह्यात पावसाची हजेरी, ऑरेंज अलर्ट

जिल्ह्यात पावसाची हजेरी, ऑरेंज अलर्ट

अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी तालुक्यात रात्रीपासून संततधार सुरू आहे, दोन आठड्यांच्या विश्रांतीनंतर पाऊस सुरू झाल्याने शेतकरी आनंदित आहेत. राज्यात पुढील चार दिवसांमध्ये म्हणजेच आज शनिवार ते मंगळवार मॉन्सून जोरदार सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे. सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुणे, मुंबई, पालघरसह इतर १३ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर २८ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मॉन्सूनचे वारे प्रचंड वेगाने सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular