मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीदिलेल्या माहितीप्रमाणे अजानबाबात जे तुम्ही करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करू. तुम्हाला तर सोडणार नाहीच, पण राज ठाकरेंनाही मारून टाकू,’ असे पत्रात लिहिले असल्याचे सांगून पत्र हिंदी भाषेत असून त्यात उर्दू शब्दही आहेत. या संदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बुधवारी भेट घेऊन राज यांना संरक्षण देण्याची मागणी केली.
गेल्या महिन्याभरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून आवाज उठवला. मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पात्रात राज ठाकरे यांनी म्हटले आहे कि, महाराष्ट्रामध्ये सैनिकांनी ४ मे रोजी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन सुरु करण्यापूर्वी ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!
राज ठाकरे यांना आलेले पत्र हे बाळा नांदगावकर यांना आले आहे. काल राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. तसेच राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे नांदगावकरांनी सांगितले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सुरक्षित आहे, इथे कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, आणि जर लागत असेल तर ठाकरे सरकारकडून सुरक्षा दिली जाईल, महाराष्ट्रातील नेत्याला हात लावायची कुणाची हिंमत नाही, शिवसेना भवनात असे धमकीचे पत्र रोज येतात, त्यामुळे ही स्टंटबाजी सोडून द्या, असं संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.