मागील दोन ते अडीच महिन्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेशी गद्दारी करून ४० आमदार खासदार शिंदे गटामध्ये सामील झाले. त्यापासून राज्यातील तळागाळातील राजकारण हादरून गेले आहे. विरोधी पक्ष एकमेकांवर पातळी सोडून चिखलफेक करताना दिसत आहेत. तर ज्यांनी बरीच वर्ष आधी शिवसेनेला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात गेलेले त्यांनी देखील शिंदे गटालाच खरी शिवसेना असे म्हटल्याने सुरु असलेल्या वादात ठिणगी पडली आहे.
ठाकरे विरुद्ध शिंदे गटात गेल्या बरेच दिवसापासून खडाजंगी पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातही चांगलीच शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या मालीकेत भाजप नेते नितेश राणे आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ये अंदर की बात है, राजन साळवी हमारे साथ है, असा दावा नितेश राणे यांनी केला होता. नितेश राणे यांच्या या दाव्याला राजन साळवी यांनी त्याच शब्दादाखल प्रत्युत्तर दिलं आहे.
राजन साळवींनी राणे कुटुंबीय ठाकरे गटासोबतच असल्याचं विधान केलं आहे. ‘नितेश राणे आमचा विरोधक आहेच. राणे कुटुंबीयांना समजायला हवं की आज नारायण राणे, नितेश राणे किंवा निलेश राणे या कुटुंबाला बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद लाभला म्हणून ते इथपर्यत पोहोचले. त्यामुळे त्यांनी माझ्यावर आरोप करणं फार चुकीचं आहे. मी शिवसेना प्रमुखांशी, शिवसेना पक्षाशी किती प्रामाणिक आहे हे त्यांना सांगण्याची गरज नाही. मी तर म्हणेन, ये अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है’, असं साळवी म्हणाले आहेत.