30 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriलांजामध्ये शिवसेनेत मोठा भूकंप, आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का

लांजामध्ये शिवसेनेत मोठा भूकंप, आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का

लवकरच तुमचे उरले-सुरले नगरसेवकही आमच्याबरोबर येतील अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे लांजा नगरपंचायतीवरही शिवसेनेचे एकहाती वर्चस्व होतं. जानेवारी २०२० मध्ये इथे नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला होता. १७ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे ९, भाजपचे ३, काँग्रेसचे २ आणि ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे नगरपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर आता चित्र बदलेलं आहे. लवकरच तुमचे उरले-सुरले नगरसेवकही आमच्याबरोबर येतील अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का बसला आहे. कारण साळवी यांच्या मतदारसंघातील लांजा नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. लांजा नगरपंचायतीमधील ठाकरे गटाचे नगराध्यक्ष आणि ५ नगरसेवक तसेच २ अपक्ष नगरसेवकांनी रत्नागिरीतील जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, लांजामध्ये आमदार राजन साळवी यांना मानणारे जसे नगरसेवक आहेत, तसेच मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांनाही मानणारे नगरसेवक आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून लांजामध्ये शिवसेनेत मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष मनोहर बाईत, नगरसेविका समृद्धी गुरव, वंदना काडगाळकर, सोनाली गुरव, सचिन डोंगरकर, प्रसाद डोर्ले यांच्यासह अपक्ष नगरसेविका मधुरा बापेरकर, दुर्वा भाईशेटे या सात नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का बसला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular