24.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRatnagiriठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे, आंब्याचे झाड कोसळले जेसिबीवरच

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे, आंब्याचे झाड कोसळले जेसिबीवरच

जवळपास एक तास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अनेक वर्षांपासून सुरु असलेले कामकाज आणि चौपदरीकरण म्हणजे वाहनचालकांसाठी एक प्रकारे डोकेदुखी ठरत आहे. या मार्गाचे काम करणारे ठेकेदार, न्यायालयाचे आदेश मानत नाहीत आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे देखील दुर्लक्ष करताना दिसतात. या रस्त्यांची झालेली दुरवस्था ही बावनदी ते आरवलीपर्यंत असणाऱ्या खड्ड्यांकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. संगमेश्वर येथील हातावर पोट असणाऱ्या छोट्या टपरीधारकांना देशोधडीला लावून या जागेवर एक इंचदेखील काम करण्यात आलेले नाही.

संगमेश्वरजवळ सध्या रस्त्याच्या दुतर्फा असणारी मोठी झाडे झटपट तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी पोकलेन, जेसीबी आणि क्रेनसारख्या मोठमोठ्या यंत्रणांचा वापर केला जात आहे.  मात्र मोठी झाडे तोडताना सुरक्षेचे कोणतेही उपाय केले जात नसल्याचे, आज ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे समोर आले आहे. एक मोठे आंब्याचे झाड दोरी तुटून थेट जेसीबीवरच कोसळले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळ सध्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणारी आणि अडचण ठरणारी भलीमोठी झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना केलेला निष्काळजीपणा झाडे तोडणाऱ्या ठेकेदाराला चांगलाच भोवला आहे. पैसाफंड इंग्लिश स्कूलजवळ एक भलामोठे आंब्याचे झाड  तोडताना ते विरुद्ध बाजूला जेसीबीवर येऊन पडले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी हानी झाली नसली तरीही महावितरणचे दोन पोल मोडून विद्युतवाहिन्या तुटून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. जवळपास एक तास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. झाडे तोडतानाचा निष्काळजीपणा वाहनचालकांच्या जीवावर उठण्याची शक्यता आहे.

आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. ठेकेदाराने झाडे तोडताना जीर्ण झालेल्या दोऱ्या वापरल्या आणि खबरदारीचे कोणतेही उपाय योजले नसल्याने ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या झाडांच्या बाजूला महावितरणच्या विद्युतभारित तारा आणि पोल आहेत; मात्र महावितरणला याबाबत कोणतीही कल्पना न दिल्याने विद्युतप्रवाह सुरू असतानाच हा दुर्दैवी प्रकार घडला. पुढे काहीतरी अघटीत घडण्याची शक्यता होती.

RELATED ARTICLES

Most Popular