23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRajapurराजापूर शहर पुन्हा पुराच्या छायेखाली

राजापूर शहर पुन्हा पुराच्या छायेखाली

पूराची शक्यता ध्यानी घेऊन शहरातील एसटी वाहतूक प्रशासनाने बंद केली होती.

बुधवारपासून सलग सुरू असलेल्या संततधार पावसाने गुरूवारीही जोर कायम ठेवल्याने अर्जुना व कोदवली नद्यांच्या पातळीत वाढ दिसून आली आहे. मुख्य शहराच्या कोदवली नदीपात्रात दबा धरलेल्या पूराच्या पाण्याने गुरुवारी सायंकाळी जवाहर चौकाच्या दिशेने कुच केल्याने ७ जुलैसारखी पूर स्थिती पुन्हा ओढवेल की काय या भीतीने नदी किनारी असलेले नागरिक, बाजारपेठेतील व्यापारी यांनी साहित्याची आवराआवर सुरू केली होती. पावसाचा जोर ध्यानी घेऊन प्रशासनही सतर्क असून यावेळचा दर गुरूवारी भरणारा आठवडा बाजार शहराऐवजी महामार्गावरील रस्त्यावर भरवण्यात आला होता.

संततधार पडणाऱ्या सलगच्या पावसाने शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र कोठेही पडझड अथवा नुकसान झाल्याचे वृत्त सायंकाळपर्यंत नव्हते हा दिलासा होता. गुरूवारी सकाळी पूराच्या पाण्याने जवाहर चौकातील पिकअप शेडपर्यंत धडक मारलेली होती. मात्र त्यानंतर पावसाचा जोर काहीअंशी ओसरल्याने पूराचे पाणी पुन्हा नदीपात्रात स्थिरावले होते.

यादरम्याने पूराची शक्यता ध्यानी घेऊन शहरातील एसटी वाहतूक प्रशासनाने बंद केली होती. ती एसटी आगारातूनच सुरू होती. शिवाय बंदरधक्का येथे दर गुरूवारी भरणारा आठवडा बाजारही महामार्गावर हलवण्यात आला होता. दुपारच्या सत्रात पूराच्या पाण्याची पातळी कमी झाला होता मात्र गुरुवारी सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पूराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली. त्यानंतर व्यापारी व नदीपात्रालगतच्या नागरिकांनी सतर्क राहत सामानाची हलवाहलव करण्यास पुन्हा सुरूवात केली होती.

RELATED ARTICLES

Most Popular