27.1 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRatnagiriमी एखाद्या व्यक्ती विरोधात तक्रार केल्यावर, त्या व्यक्तीची चौकशी करणार का?

मी एखाद्या व्यक्ती विरोधात तक्रार केल्यावर, त्या व्यक्तीची चौकशी करणार का?

शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची बुधवारी अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साडेचार तास चौकशी केली.

राजापूर आमदार राजन साळवी यांच्यासमवेत शेकडो शिवसैनिकांनी अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर जमून घोषणाबाजी देत मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. राजन साळवी यांची सोमवारी दि. ५ रोजी अलिबाग येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जाणार होती; मात्र, ते आले नव्हते. सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर झाल्यानंतर राजन साळवींची, त्यांच्या बंधूंची, मुलांची, नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. चौकशीला सामोरे गेल्यानंतर प्रतिक्रिया देताना राजन साळवी यांनी सांगितले की, वेंगुर्ल्यातील सनी नलावडे नामक व्यक्तीने ठाणे कार्यालयात माझ्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यावरून हि एसीबी चौकशी सुरू आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची बुधवारी अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साडेचार तास चौकशी केली. चौकशीत राजन साळवी यांच्याकडून त्यांच्या कुटुंबीयांच्या उत्पन्नाची साधने, व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती घेण्यात आली. उर्वरित माहितीसाठी तपासिक अधिकाऱ्यांनी सहा फॉर्म दिले असून त्याद्वारे ही सविस्तर माहिती २० जानेवारीपर्यंत देण्याची मुदत देण्यात आली आहे.

या सर्वावर साळवी म्हणाले, भ्रष्टाचाराच्या आरोपात फसवून शिवसेनेचा आवाज बंद होऊ शकणार नाही. ‘शिवसेना’ या चार अक्षरी शब्दांत काय ताकद असते, ते दाखवून देण्यास शिवेसेनेचे कार्यकर्ते कायमच सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाला विविध प्रकरणांमध्ये अडकवण्याचा खटाटोप सत्ताधारी शिंदे, फडणवीस सरकारने सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, मी एखाद्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार केल्यानंतर त्या व्यक्तीची चौकशी करणार का, असा प्रश्न एसीबी अधिकाऱ्यांना विचारल्याचे साळवी यांनी सांगितले. एसीबीच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करताना, ते जी माहिती मागतील ती माहिती देण्यास मी तयार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular