29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...
HomeDapoliसाई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना काहीसा दिलासा

साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना काहीसा दिलासा

दापोली न्यायालयाने माजी पालकमंत्री अनिल परबांना अनुपस्थित राहण्यास आज मुभा दिली.

दापोली मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी दापोली न्यालायलाने माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यासह सदानंद कदम, पुष्कर मुळ्ये या तिघांना समन्स बजावले होते. या प्रकरणातील क्रमांक तीनचे आरोपी आणि सी काँच बीच रिसॉर्टचे मालक पुष्कर मुळ्ये आज बुधवारी १४ डिसेंबर रोजी दापोली न्यायालयात झाले हजर झाले. न्यायालयाने पुष्कर मुळे यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.

कोकणात रत्नागिरी जिल्हयातील मुरूड येथील वादग्रस्त ठरलेल्या किरीट सोमय्या सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पर्यावरण संरक्षण कायदा, कलम १५ अन्वये बजावण्यात आलेल्या समन्स प्रकरणी अनुपस्थितीचा विनंती अर्ज मंजूर करत दापोली न्यायालयाने माजी पालक मंत्री अनिल परब यांना न्यायालयाने हा दिलासा दिला आहे.

परब यांच्या वतीने त्यांचे वकील आज दापोली कोर्टात हजर झाले. वकिलांनी दापोली न्यायालयात माजी पालकमंत्री अनिल परब यांना आज उपस्थित राहता येणार नाही असा विनंती अर्ज केला होता तो मंजूर करण्यात आला आहे. दापोली न्यायालयाने माजी पालकमंत्री अनिल परबांना अनुपस्थित राहण्यास आज मुभा दिली.

दापोली न्यायालयात केंद्रीय पर्यावरण विभागाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर आज सुनावणी झाली. पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने खटला दाखल केला आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या वतीने अ‍ॅड. प्रसाद कुवेसकर वकील म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणी आता पुढील सुनावणी १२ जानेवारी रोजी होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular