28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRajapurएमएसआरडीसीकडे महाराष्ट्रातील प्राचीन वास्तूंच्या संग्रहाची जबाबदारी, अर्थसंकल्पात निधीची तरतूद

एमएसआरडीसीकडे महाराष्ट्रातील प्राचीन वास्तूंच्या संग्रहाची जबाबदारी, अर्थसंकल्पात निधीची तरतूद

एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील या आठ मंदिरात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील धूतपापेश्वर मंदिराचा समावेश आ

महाराष्ट्रासह संपूर्ण कोकणाला प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, विविध प्रकारची शिल्प आणि दुर्मिळ लेण्यांचा वारसा लाभला आहे. काळानुसार, आता या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच आठ महत्त्वाच्या प्राचीन मंदिरांचे जतन, संवर्धन आणि परिसर विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. तसेच कामाची जबाबदारी एमएसआरडीसीला देण्यात आली आहे.

एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील या आठ मंदिरात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील धूतपापेश्वर मंदिराचा समावेश आहे. राज्य सरकारकडून आराखडय़ाला मंजुरी मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कामासाठी निविदा काढण्यात येईल, अशी माहिती दिली.

राज्यातील आठ प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामाचा लवकरच श्रीगणेशा करण्यात येणार आहे. मंदिरांच्या जतन-संवर्धनाचा बृहत् आराखडा पूर्ण झाला असून त्या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. एमएसआरडीसीने आठ प्राचीन मंदिराच्या संवर्धनाचा बृहत् आराखडा तयार करण्यासाठी चार सल्लागारांची नेमणूक केली होती. सल्लागारांनी प्रत्येकी दोन मंदिरांचा बृहत् आराखडा पूर्ण करण्यात आला आहे

मंदिरे प्राचीन असल्याने त्यांच्या मूळ रूपाला कुठेही धक्का न लावता त्यांची पारंपारिकता जपण्यात येणार आहे. पुरातत्त्व विभागाच्या सर्व नियमांचे पालन करत संवर्धनाचे काम केले जाईल. मंदिरांची दुरुस्ती, मंदिर परिसराचा विकास आणि भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची कामे या प्रकल्पा अंतर्गत केली जाणार आहे. त्यामुळे पुरातन वास्तूंचा ठेवा अशा प्रकारे जतन करून ठेवण्यास मदत मिळणर आहे.

RELATED ARTICLES

Most Popular