26 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRajapurशिक्षकांना चाकरमान्यांसाठी चहा वाटपाचे नियोजन करण्यासाठी एसटी आगारामध्ये ड्युटी !

शिक्षकांना चाकरमान्यांसाठी चहा वाटपाचे नियोजन करण्यासाठी एसटी आगारामध्ये ड्युटी !

"कोकणातील शिक्षकांना गणपतीसाठी गावाकडे येणाऱ्या लोकांसाठी चहापान व्यवस्था करण्याचे आदेश काढणाऱ्या रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध.

शिक्षकांना अध्यापना ऐवजी इतरच कामे अधिक लावली जात असल्याने नेमकं शिक्षकांनी करायचे तरी काय ! असा प्रश्न समस्त शिक्षक वर्गाला पडला आहे. निवडणुकांची कामं किंवा जनगणनेच्या कामांसाठी आतापर्यंत महिनोन्महिने कामाला लावलं जात होतं, मात्र आता चक्क गणेशोत्सवासाठी एसटी आगारामध्ये चाकरमान्यांसाठी चहा वाटपाचे नियोजन करण्यासाठी शिक्षकांना आदेश दिले गेले आहेत. गणपती उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या बाबतीत नियोजन करण्यासाठी चक्क प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ड्युटी एसटी आगारामध्ये लावण्यात आल्याने सर्वत्र टीका केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आदेश अशा प्रकारचे काढले असून, या आदेशानंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. चहा वाटपाची जबाबदारी राजापूर तालुक्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांना लावण्यात आली आहे. आणि हे नक्कीच निषेधार्थ आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ राजापूर तालुक्यातील ३९  शिक्षकांची ड्युटी राजापूर आगारात लावण्यात आली आहे. राजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. ए. कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज तीन शिक्षक हे किमान ८  तास एसटी आगारात ड्युटी करणार असून, .  त्यानंतर पुढील १३ दिवसांमध्ये त्याला अशाप्रकारचं काम लागणार नाही आहे. राजापूर तालुक्यात जवळपास ८५०  शिक्षकापैकी ३९ शिक्षकांची ड्युटी राजापूर आगारात लावण्यात आली आहे. हा निर्णय प्रांत आणि तहसीलदारांच्या आदेशानुसार घेण्यात आल्याचे सांगितले असून, या निर्णयाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही ट्वीट करुन या निर्णयावर आक्षेप घेत रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. सोबतच कोकणातील नेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही त्याद्वारे निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “कोकणातील शिक्षकांना गणपतीसाठी गावाकडे येणाऱ्या लोकांसाठी चहापान व्यवस्था करण्याचे आदेश काढणाऱ्या रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध. बरं राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर हे कोकणातीलच आहेत. शिक्षकांना शिक्षण सोडून इतर कामे द्यायची व शैक्षणिक गुणवत्तेवरून जबाबदारही धरायचं. वा रे!”

RELATED ARTICLES

Most Popular