नळाच्या पाण्यावरून होणारी भांडणे, भांड्याला लागणारी भांडी सर्वज्ञात आहेत. कालांतराने समेट होऊन ती भांडणे मिटतात. पण काही ठिकाणी हीच भांडणे एवढी रौद्र रूप घेतात कि, त्याचे रुपांतर मारामारीमध्ये होते. रत्नागिरी शहरातील राजिवडा येथे सार्वजनिक पाणी भरण्यावरून दोन गटात बेछुट मारामारी झाली. यामध्ये दोन महिला जखमी झाल्या असून शहर पोलीस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्मिया रियाज होडेकर रा. जामा मशीद, राजीवाडा, रत्नागिरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची काकी फातिमा होडेकर घरासमोर पाणी भरत असताना जैबून इकबाल होडेकर हिने पाणी भरायचे नाही असे सांगितले. यावरून दोघींच्यामध्ये वाद निर्माण झाला.
यावेळी तेथे फैय्याज होडेकर, शायदा होडेकर, नासिर होडेकर, वहाब होडेकर, सईदा होडेकर, नाझीया गडकरी, सैजादि सोलकर, नुसेबा गडकरी, मैरून होडेकर, रेश्मा होडेकर, तन्वीर सोलकर, अश्रफ होडेकर, आस्मा होडेकर अशा १३ जणांनी फातिमा इम्रान होडेकर यांना व त्यांच्या २ मुलांना अरफा होडेकर, हर्षद होडेकर याना शिवीगाळ करत हातातील रॉडने शरीरावर मारहाण केली. यामध्ये तस्मिया होडेकर आणि सौबान होडेकर हे दोघे जखमी झाले आहेत. त्यानंतर तस्मिया यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.
तर दुसऱ्या बाजूने नाझीया सिराज गडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्या स्वतः व त्यांची आई जैबुनिसा इकबाल होडेकर या सकाळी ११.३० वा. बाजारातुन घरी जात असताना इम्रान होडेकर, फातिमा होडेकर, अरशद होडेकर, शबाना होडेकर, सौबान होडेकर, तस्मिया होडेकर या ६ जणांनी शिवीगाळ करून नाझीया यांचे डोके भिंतीवर आपटले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तसेच या झटापटीमध्ये त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व आईच्या गळ्यातील चेन तुटून नुकसान झाले. याप्रकरणी नाझीया यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसानी ६ जणांविरोधात भादवी ३२४, १४३, १४७, ५०४, ५०६, ४२७ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.