25.8 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriमतदार जनजागृतीसाठी दीडशे बोटींची रॅली - धनंजय कुलकर्णी

मतदार जनजागृतीसाठी दीडशे बोटींची रॅली – धनंजय कुलकर्णी

मतदार जनजागृतीसाठी आज मिरकरवाडा बंदरावर मच्छीमारी नौकांची रॅली काढण्यात आली.

विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मच्छीमारांनी मतदान करावे. तसेच आपल्या गावामध्ये, गल्लीमध्ये मतदार जनजागृतीसाठी दूत म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विशेषतः मच्छीमार व्यावसायिकांमध्ये मतदार जनजागृतीसाठी आज मिरकरवाडा बंदरावर मच्छीमारी नौकांची रॅली काढण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त आनंद पालव, आदींसह मच्छीमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी सदस्य, व्यावसायिक उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार जनजागृती हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होण्यासाठी निवडणूक आयोग जनजागृती करण्यावर भर देत आहे.

आपल्या जिल्ह्याला २३७ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. याच समुद्रकिनाऱ्यावरती मच्छीमार बांधवांचा व्यवसाय चालतो. मासेमारीसाठी ते समुद्रामध्ये जात असतात. २० नोव्हेंबर हा दिवस मतदानासाठी वेगळा काढून ठेवा. त्या दिवशी मासेमारी बंद असणार आहे. सर्व मच्छीमारांपर्यंत हा संदेश मतदान करावे. देशाची सुरक्षितता हाही एक महत्त्वाचा भाग आहे. समुद्रामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक असतील तर त्याची माहितीही पोलिसांना दिली पाहिजे म्हणजे त्यांच्यावर कारवाई करता येईल. यावेळी शाहीर राजेश गोसावी, विष्णू पवार आणि जनार्दन मोहिते यांच्या पथकाने पोवाडा शाहिरीमधून उपस्थितांची जनजागृती केली. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा. जनतेचा आवाज म्हणून लोकप्रतिनिधी असतात, त्यांना निवडण्याचा अधिकार या मतदानातून मिळालेला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular