31.1 C
Ratnagiri
Friday, April 19, 2024

सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, हल्लेखोरांनी घेतली होती खास ट्रेनिंग

सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींची मुंबई...

अमित शहांचा मान ठेवत एक पाऊल मागे – उदय सामंत

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी...

‘हर घर मशाल’ अभियानाच्या माध्यमातून चिपळुणात महाविकास आघाडीची एकजुट

भक्कम अशी एकजूट दाखवत महाविकास आघाडीने चिपळूणमध्ये...
HomeEntertainmentरानबाजार-वेबसीरिज, तेजस्विनी आणि प्राजक्ताचा बोल्डनेस बघून प्रेक्षक थक्क

रानबाजार-वेबसीरिज, तेजस्विनी आणि प्राजक्ताचा बोल्डनेस बघून प्रेक्षक थक्क

या सीरिजला वेबविश्वाला हादरवून टाकणारा 'रानबाजार' असंही म्हटलं जातं आहे.

रानबाजार या वेब सीरिजचा टीझर आला आणि त्या पाठोपाठ ट्रेलर. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांच्या बोल्ड लूकची चर्चा सुरू झाली. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या वेब सीरिजचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं आहे. या पाॅलिटिकल क्राइम सीरिजची आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. प्लॅनेट मराठीवर येत्या २० मे रोजी ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. वेब सीरिजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली आहे.

‘रानबाजार’ या वेब सीरिजची सोशल मीडियावर खूपच अनोखी चर्चा सुरु आहे. रानबाजारचे नुकतेच दोन टीझर शेअर करण्यात आले आहेत. या सीरिजला वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ असंही म्हटलं जातं आहे. या सीरिजचा विषय आणि टीझर दोन्हीही खूपच बोल्ड असल्याने, मराठी वेब विश्वात पहिल्यांदाच इतका बोल्डनेस दाखण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांनी या सीरिजमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

मीडियाशी बोलताना अभिजीत पानसे म्हणाले, इथे जंगल का कानून चलता है, म्हणून ते रानबाजार नाव ठेवलं गेलं.’ या वेब सीरिजमध्ये सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, उर्मिला कोठारे, मोहन जोशी, वैभव मांगले, जयंत सावरकर असे दिग्गज कलाकार आहेत. राज्यातील राजकारणी लोकांचा बुरख्या मागचा फसवणूक करणारा कावेबाज चेहरा आणि त्यांचं धूर्त वागणं कसं असतं हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. हे राजकारणी सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्ता राखण्यासाठी कोणत्या थरापर्यंत जातात, याचं संपूर्ण चित्रण या सीरिजद्वारे प्रेक्षकांसमोर आणण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular