ना. नारायण राणे यांना दिल्लीला पाठवायचेय. यासाठी सर्व पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. आजचा हा ट्रेलर दाखवला आहे, पिक्चर अजून बाकी आहे असे म्हणत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांचा सूपडासाफ करून राणे दिल्लीत पोहोचतील, असा विश्वास येथे व्यक्त केला. शुक्रवारी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जयस्तंभ येथे कॉर्नर सभा पार पडली. या सभेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दमदार फटकेबाजी केली. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना दिल्लीला पाठवायचे आहे, असा चंग साऱ्यांनी बांधला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मी भारावून गेलोय ना. राणे – यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे म्हणाले की, माझा कार्यकर्ता हा माझा अभिमान आहे. आज माझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एवढ्या रणरणत्या उन्हातही आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहिलात. मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या गाडीने तहानभूक विसरून या रॅलीत सहभागी झालात आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला जो पाठिंबा दिलात, जे सहकार्य केले हे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे.
माझा विजय निश्चित – ते पुढे म्हणाले की तुमच्या या उत्स्फूर्त पाठींब्याने लोकसभा निवडणुकीतील माझा विजय निश्चित झाला आहे. ३ लाखांपेक्षा जास्तचे मताधिक्य मला मिळेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी व्यक्त केला. रत्नागिरी येथे भव्य रॅलीचे जाहीर सभेत रुपांतर झाल्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
साऱ्यांचे आभार – ना. नारायण राणे म्हणाले, महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेना, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी, रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष आणि घटक पक्षांच्यावतीने मला उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी उम`दवारी अर्ज भरताना उपस्थित राहून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम अशा सर्वच महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, मला पाठींबा दिला आणि या लोकसभा निवडणुकीत विजयाचा विश्वास दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानतो, असे त्यांनी सांगितले.
कमी बोलू, जास्त काम करू, सामंत – आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना अवघ्या म ोजक्या शब्दात ना. उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. ना. नारायण राणे यांच्या विजयावर शिक्काम ोर्तब झाले आहे. आम्हीं कमी बोलू, जास्त काम करून दाखवू असे ना. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. तसेच ४०० पार मध्ये राणेंना सर्वाधिक मताधिक्य असेल, असेही ते म्हणाले.