26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeChiplunटेरव ग्रामपंचायत निवडणुकीत येणार रंगत

टेरव ग्रामपंचायत निवडणुकीत येणार रंगत

टेरव येथील ग्रामस्थांनी गेल्या महिन्यात विविध मागण्यांसाठी पंचायत समितीसमोर महिनाभर उपोषण केले होते.

तालुक्यातील टेरव, कालुस्ते खुर्द आणि कालुस्ते बुद्रुक ग्रामपंचायतीत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. टेरवमध्ये थेट सरपंचपदासाठी एक, तर सदस्यपदासाठी ५, कालुस्ते खुर्दमध्ये सरपंचपदासाठी १ व सदस्यपदासाठी ८ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. टेरव तसेच कालुस्ते खुर्दमधील निवडणूक चुरशीची होणार आहे. टेरव येथील ग्रामस्थांनी गेल्या महिन्यात विविध मागण्यांसाठी पंचायत समितीसमोर महिनाभर उपोषण केले होते. त्यानंतर चौकशी सुरूच आहे. या परिस्थितीत टेरव ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे.

१५ वर्षांपासून टेरव ग्रामपंचायतीवर रयत पॅनेलचे वर्चस्व आहे. येथे ९ सदस्य आणि थेट सरपंच अशा दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. आतापर्यंत रयत पॅनेलकडून सदस्यपदासाठी ५ जणांनी तर थेट सरपंचपदासाठी माजी उपसरपंच किशोर कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विरोधी पॅनेलकडूनही सर्व जागांवर तसेच थेट सरपंचपदासाठी उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे टेरव ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. कालुस्ते बुद्रुकमध्ये गुरुवार दुपारपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता.

येथे थेट सरपंचासह ७ जागांसाठी निवडणूक होत असून बिनविरोध निवडणुकीची शक्यता कमी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कालुस्ते खुर्द येथे थेट सरपंचपदासाठी एक तर सदस्यपदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. टेरव येथे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी स्वप्नील कांबळे, कालुस्ते बुद्रुककरिता विस्तार अधिकारी मिलिंद केळसकर तर कालुस्ते खुर्दकरिता सार्वजनिक बांधकामचे अभियंता विशाल नलावडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular