27.6 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeKhedसह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अर्धा टन वजनाची तोफ ४० दुर्गसेवकांनी चार तासांत किल्ल्यावर...

सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अर्धा टन वजनाची तोफ ४० दुर्गसेवकांनी चार तासांत किल्ल्यावर आणली

कित्येक वर्षापासून ही तोफ दरीमध्ये पडल्याने दुर्लक्षित होती. आता ही तोफ पर्यटक पाहू शकतात.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रसाळगड किल्ल्यावर दरीमध्ये पडलेली अर्धा टन वजनाची तोफ ४० दुर्गसेवकांनी चार तासांत किल्ल्यावर आणली. दुर्गसंवर्धन मोहिमेद्वारे सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ही कामगिरी करत तोफ गडावरील झोलाई देवीच्या मंदिरासमोर स्थापित केली आहे.

रसाळगडाच्या दक्षिण दिशेकडील दरीमध्ये ४०० फूट खोल दरीमध्ये अर्धा टन वजनाची ५ फूट लांबीची तोफ रुतलेली होती. ही तोफ चार तासांत संस्थेच्या ४० दुर्गसेवकांनी गडावर आणली. कित्येक वर्षापासून ही तोफ दरीमध्ये पडल्याने दुर्लक्षित होती. आता ही तोफ पर्यटक पाहू शकतात. सध्या या गडावर एकूण १८ तोफा आहेत.

सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत महाराष्ट्रातील गडदुर्ग संवर्धनाचे काम गेली १४ वर्षे केले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गडकिल्याच्या संवर्धनासाठी मागील ४ वर्षापासून या संस्थेने काम हाती घेतले आहे. राज्य पुरातन विभाग आणि केंद्र पुरातन विभागच्या अंतर्गत हे गड संवर्धनाचे कामकाज पहिले जाते.

इंटरनेटवर मिळालेल्या माहिती नुसार, रसाळगडावर एकूण १८ तोफा आहेत. २३ जानेवारी २०२२ रोजी गडावरील या मोहिमे दरम्यान दक्षिण दिशेकडील दरीमध्ये ४०० फूट खोल दरीमध्ये मध्ययुग कालीन पाण्याची टाकी आणि त्या शेजारी हि अर्धा टन वजनाची आणि ५ फूट लांबीची पुरातन तोफ आहे. कित्येक वर्षे तिच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. ती या दुर्गसेवकांनी अथक परिश्रमाने चार तास अविरत कष्ट घेऊन गडावर स्थानापन्न केली असून त्याचा रिपोर्ट पुरातन विभाग कार्यालयाला दिला आहे. आता ही तोफ पर्यटकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular