26.1 C
Ratnagiri
Thursday, July 18, 2024

जिल्ह्यात २० तारीखे पर्यंत रेड अलर्ट…

जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून...

‘सिव्हिल’मधील समस्यांचा वाचला पाढा – शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

गोरगरिबांचा आधार असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वरून रंगरंगोटी...

चिपळूणमध्ये विहिरीतील पाण्यात मगरीचे पिल्लू, वनविभागाने पकडले

शहरातील वाणीआळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे...
HomeRatnagiri३ दिवसांत आरोपी गजाआड

३ दिवसांत आरोपी गजाआड

रत्नागिरी चिपळूणमध्ये भोगाळे एस.टी स्टँड परिसरात २४ वर्षीय परिचारिकेवर झालेल्या अत्याचारप्रकरणी चिपळूण पोलिसांनी कसून घेतलेल्या शोधामुळे ३ दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत, संशयित आरोपीला चिपळूण आणि रत्नागिरी गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने लवेल येथून अटक करण्यात आली आहे.

गुरुवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास रात्रपाळी साठी हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या परिचारिकेला जबरदस्तीने रस्त्याच्या बाजूला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण रत्नागिरी आणि चिपळूण शहर हादरले आहे. रत्नागिरीतील सतर्क पोलीस यंत्रणेमुळे सध्या गुन्ह्यांचे प्रकार कमी झाले होते. परंतु, अचानक असा दुर्दैवी प्रकार घडल्याने पोलीस यंत्रणा सुद्धा हादरून गेली. या प्रकारणामध्ये अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल करून पोलिसांची शोध मोहीम सुरु होतीच. पिडीत परिचारिकेने केलेले आरोपीचे हुबेहूब वर्णन, तिच्या मोबाईलचा ट्रेस आणि त्या आरोपीची गुठखा खाण्याची पद्धत यामुळे पोलीस आरोपीचा शोध घेत होते.

पोलिसांना मिळालेल्या खबरीवरून सांगितलेल्या वर्णनाची व्यक्ती सदर परिसरामध्ये दिसण्यात आली असून, एका भंगार व्यावसायिकाचा मुलगा आणि संशयित आरोपीचे वर्णन हुबेहूब जुळत होते. पोलिसांनी खोटे ग्राहक बनून त्याच्या दुकानात चौकशी केली असता, त्याचा ऑडीओ आणि व्हीडीओ रेकोर्ड करून पिडीत परिचारिकेला दाखवला असता, तिने आरोपीला ओळखले असता, पोलिसांनी त्याच्या घरामधून त्याला उचलले. पोलिसांनी राबविलेल्या अद्ययावत फोन ट्रेसिंग तपास यंत्रणेमुळे या गुन्ह्याच्या तपासाला गती मिळत गेली.

चिपळूण आणि गुन्हे शाखा रत्नागिरीच्या पोलिसांच्या कार्यतत्पर आणि कर्तबगार कामगिरीमुळे आम. भास्कर जाधव, आम. शेखर निकम तसेच शिवसेनेचे सचिन कदम, बाळा कदम, संदीप सावंत यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

Most Popular