29.2 C
Ratnagiri
Sunday, July 13, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeRatnagiriहायवे हॉटेल व्यावसायिकांचे सरकारला साकडे

हायवे हॉटेल व्यावसायिकांचे सरकारला साकडे

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या संचारबंदीच्या निर्णयाने सगळ्याच व्यवसायांवर कमी अधिक प्रमाणात परिणाम झालेला दिसून येत आहे. रत्नागिरीतील कोरोना प्रादुर्भावाचा आकडा पाहून ७०% व्यवसायांना शिथिलता देण्यात आली आहे. परंतु अजून ३०% व्यवसाय हे अजून शासनाच्या निर्बंधात आहेत.

जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकांना फक्त होम डिलीव्हरीची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे शहरी विभागातील व्यावसायिकांना या गोष्टी शक्य होऊ शकतात, पण ज्यांची हॉटेल महामार्गावर आहेत, त्या व्यावसायिकांनी काय करायचे? आज जरी होम डिलीव्हरी ची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी हायवेवर असणाऱ्या हॉटेल मध्ये ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. हायवेवर असणाऱ्या हॉटेल अथवा धाब्यामध्ये दुरवरुन येणारे ट्रक वाहनचालक, अवजड वाहतूक करणारे वाहनचालक, क्लीनर असे रात्री अपरात्री सुद्धा जेवण करायला उतरतात. परंतु हॉटेल मध्ये जेवायची परवानगी नसल्याने वाहनचालक आणि ग्राहक सुद्धा आणि संचारबंदीमुळे हॉटेलला ग्राहक कमी प्रमाणात मिळतात.

त्यामुळे हॉटेल व्यवसाय जेमतेम १०% चालतो, परंतु मिळणाऱ्या उत्पन्नावर हॉटेल कामगारांचे पगार, हॉटेलचे कर्ज हफ्ते, विविध बिल, इतर खर्च करणे हॉटेल मालकांना कठीण जात आहे. गेले दीड वर्ष सुरु असलेल्या संचारबंदीमुळे हॉटेल व्यवसायावर खूपच दुष्परिणाम झालेले आढळून येत आहेत. हायवे ला साधारण हजाराच्या आसपास छोटे मोठे हॉटेलचे व्यावसायिक आहेत. संचारबंदीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

त्यामुळे हॉटेल मालकांनी सरकारकडे कळकळीची विनंती केली आहे कि, सरकारने आम्हाला हॉटेल उघडण्याची परवानगी द्यावी , आम्ही ५०% ग्राहक घेऊन, कोरोना निर्बंधित नियमांचे पूर्णपणे पालन करू, परंतु, आता व्यवसाय बंद पडायला आल्याने नियमित हॉटेल सुरु करू द्यावी.

RELATED ARTICLES

Most Popular