21.1 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriरत्नागिरीतील पोषण आहार गोंधळ प्रकरणी आम. सामंतांची तीव्र नाराजी

रत्नागिरीतील पोषण आहार गोंधळ प्रकरणी आम. सामंतांची तीव्र नाराजी

मुलांच्या जीवाशी खेळल्याबद्दल संबंधितांवर थेट गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी शहरातील शाळांमध्ये सेंट्रल किचनद्वारे पोषण आहार वितरणासाठी नेमलेल्या संस्थांच्या नियोजनात होत असलेल्या गोंधळाविषयी आम. उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सतीश शेवडे यांनीही माझ्याकडे तक्रार केली आहे. सामंत म्हणाले, कारभार सध्या प्रशासनाकडे आहे. त्यांच्यामार्फत ही कार्यवाही सुरू आहे. सेंट्रल किचनसाठी निविदा काढताना स्थानिक बचत गटांना प्रथम प्राधान्य देण्याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे होते; परंतु तसे झालेले दिसत नाही.

बाहेरुन आलेल्या ठेकेदारांकडून सेंट्रल किचनच्या नावाखाली न शिजलेला पोषण आहार शाळांमध्ये वितरीत केला जात असेल तर त्यांच्या मुलांच्या जीवाशी खेळल्याबद्दल संबंधितांवर थेट गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केली. तसेच आतापर्यंत स्थानिक बचत गट चांगल्या पद्धतीने काम करत होते, तर निविदेमध्ये त्यांना कशा पद्धतीने न्याय मिळेल याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केलेले दिसून येते आहे, असेही त्यांनी सांगितले.

जास्त प्रमाणातील जेवण तयार करून ते वितरित करताना अडचणी येणारच. पण सोबतच पोषण आहार वाटप करणार्‍या व्यक्तींचीही तपासणी करणे गरजेचे होते. पूर्वी जे प्रामाणिकपणे जेवण करत होते, त्यांना डावलून निवडलेल्या संस्थांकडून चुकीच्या पद्धतीने आहार देणे एकप्रकारे लहान मुलांच्या जीवाशी खेळल्यासारखेच आहे. संबंधितांना वारंवार संधी देण्यापेक्षा त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावयास हवे होते. स्थानिक बचत गटांना संधी दिली असती तर लोकांना रोजगार मिळाला असता. ही बाब प्रशासनाने का लक्षात घेतली नाही. ही परिस्थिती फक्त रत्नागिरीतच नाही तर संपूर्ण राज्यात उद्भवणार आहे. त्यामुळे कसून चौकशी आणि कठोर कारवाई ही झालीच पाहिजे.

RELATED ARTICLES

Most Popular