29.1 C
Ratnagiri
Sunday, February 25, 2024

बहुजनांनी ओबीसी झेंड्याखाली एकत्र यावे – चंद्रकांत बावकर

कुणबी समाजासह ओबीसी समाजाच्या विकासासाठी संघटन होण्यासह...

सहा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार

कृषी, कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय...

रत्नागिरी ‘लायन्स क्लब’च्या डायलिसिस सेंटरचा प्रारंभ

लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालित यशस्वी नेत्र रुग्णालयानंतर...
HomeRatnagiri११ पोलीस अधिकाऱ्यांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या, बदली फक्त दोन

११ पोलीस अधिकाऱ्यांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या, बदली फक्त दोन

चार निरीक्षकांच्या बदल्यांत रत्नागिरीमध्ये कोल्हापूरहून दत्तात्रय नाळे, सुदाम माने हे दोनच अधिकारी दाखल होणार आहेत.

राज्याच्या गृह विभागाने नुकतेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची सातारा येथे, निशा जाधव यांची मुंबई, अरविंद घोडके यांची सांगली, विनीतकुमार चौधरी यांची पदोन्नतीवर प्रतिक्षेत बदली झाली आहे. चार निरीक्षकांच्या बदल्यांत रत्नागिरीमध्ये कोल्हापूरहून दत्तात्रय नाळे, सुदाम माने हे दोनच अधिकारी दाखल होणार आहेत.

जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक अशा एकूण ११ अधिकाऱ्यांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या झाल्या आहे. त्या बदल्यात फक्त दोन पोलिस निरीक्षक रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले आहेत.  रत्नागिरीतील सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावरील भैरु जाधव यांची मुंबई रेल्वे, संदीप पाटील यांची मुंबई शहर, आबासो पाटील यांची मुंबई शहर, मधुकर मौळे यांची मुंबई शहर, संजय कातीवले यांची लोहमार्ग मुंबई आणि चित्रा मडवी यांची मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे. उपनिरीक्षक पदावरील निषाद काळे यांची कोल्हापूर परिक्षेत्रात बदली झाली आहे.

पोलिस दलात मुळातच अधिकारी वर्ग कमी प्रमाणात असल्याने, इतर अधिकाऱ्यांवर सर्व कामाचा ताण येतो आहे. त्यात चांगले अधिकारी गेले असून तुलनेत जिल्ह्याला कमी अधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे उर्वरित अधिकारी येईपर्यंत कार्यरत अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण राहणार आहे. रत्नागिरीत रूजू होणारे पोलिस निरीक्षक नाळे यांनी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्याची धुरा सक्षमपणे सांभाळली. त्यांनी गणेशोत्सव, नवरात्रोत्सवातील बंदोबस्ताबरोबर गुन्हेगारांवर चांगलीच वचक निर्माण करून आपली छाप पाडली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात देखील त्यांच्या उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध व्यवहारामुळे निश्चितच छाप पडेल.

RELATED ARTICLES

Most Popular