25.2 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeSindhudurgआता बंद असलेली “त्या” खुनाची फाईल पुन्हा उघडणार

आता बंद असलेली “त्या” खुनाची फाईल पुन्हा उघडणार

हा खून चोरीच्या उद्देशाने झाला की अन्य कारणाने, याचा सुगावा अद्यापपर्यंत लागला नाही.

सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथे राहत असलेले निवृत्त एसटी वाहक कर्मचारी रमेश ठाकूर यांचा मृतदेह ८ जुलै २०२१ ला त्यांच्या राहत्या घरात मिळाला होता. ठाकूर यांचे लग्न झाले नव्हते. त्यांचे नातेवाईक बाहेर असल्याने ते घरी एकटेच राहत होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञाताकडून त्यांचा खून करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह ते राहत असलेल्या घरात न मिळता तो बाजूच्या खोलीत मिळाला होता. ही खोली सहसा ते भाड्याने देत असत; पण त्या काळात कोण भाड्याने राहत नव्हते. त्यामुळे ठाकूर हेच ही खोली वापरत होते.

या संधीचा फायदा अज्ञाताकडून घेण्यात आला आणि कोणत्याही हत्याराचा वापर न करता ठाकूर यांचा खून करून गळ्यातील चेन चोरून नेली. या चेनमधील काही भाग तेथेच पडलेला होता. त्यामुळे हा खून चोरीच्या उद्देशाने झाला की अन्य कारणाने, याचा सुगावा अद्यापपर्यंत लागला नाही.

तत्कालीन पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी सुरुवातीचे काही दिवस तपास केला; पण नंतर त्यांची बदली झाली आणि तपासाची फाईल बंद झाली, ती अद्यापपर्यंत उघडली नाही. निवृत्त एसटी वाहक रमेश ठाकूर यांच्या खुनाचा तपास पुन्हा एकदा होणार आहे.

सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सौरभ अग्रवाल यांनी प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर बंद असलेली ठाकूर यांची फाईल पुन्हा एकदा हाती घेतली आहे. तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनही माहिती घेतली. त्यामुळे आता बंद असलेली खुनाची फाईल पुन्हा उघडणार आहे. त्यांनी स्वतः सबनीसवाडा येथे जाऊन मृत रमेश ठाकूर यांच्या घराची व परिसराची पाहणी केली. त्यामुळे या खुनाचा छडा लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular