28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRatnagiriरत्नागिरीच्या समुद्रकिनारी शेवाळ संवर्धन प्रकल्प सुरु, अनेक स्थानिकांना उत्पन्नाचे साधन

रत्नागिरीच्या समुद्रकिनारी शेवाळ संवर्धन प्रकल्प सुरु, अनेक स्थानिकांना उत्पन्नाचे साधन

पंतप्रधान मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत या प्रकल्पाला रत्नागिरीमध्ये मंजुरी मिळाल्याने स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.

रत्नागिरीला लाभलेल्या अफाट समुद्रकिनाऱ्यामुळे मासेमारी आणि पर्यटन व्यवसाय तर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार निर्माण व्हावा यासाठी अजून कोणता व्यवसाय करता येईल याबाबत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे संबंधितासोबत विचार सुरु आहेत. समुद्राशी निगडीत आणि स्थानिक ग्रामीण भागातील बेरोजगार, स्थानिक महिला यांना उपजीविकेचे साधन निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

रत्नागिरी तालुक्यात समुद्री शेवाळ संवर्धन प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. काळबादेवी आणि गोळप येथे प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात देखील आली आहे. काळबादेवी, गोळप, मिऱ्या, भाट्ये या चार समुद्रकिनाऱ्यांवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत या प्रकल्पाला रत्नागिरीमध्ये मंजुरी मिळाल्याने स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.

या प्रकल्पाबद्द्ल माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले कि, हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील पहिला, तर देशातील दुसरा क्रमाकांचा आहे. या शेवाळ प्रकल्पाचा उपयोग कॉस्मेटिक आणि जेली चॉकलेट यांचे उत्पादन करण्यासाठी तयार केला जाणार आहे. तसेच या प्रकल्पातून २०० स्थानिक महिलांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे.

हा शेवाळ प्रकल्प अल्पावधीतच पूर्णत्वाला जाणार असून, या माध्यमातून आणखी अनेक स्थानिकांना काम मिळणार आहे. याअंतर्गत कप्पा पिकस या जातीचे शेवाळाचे उत्पादन आता काळबादेवी आणि मिऱ्या या ठिकाणी घेतले जात आहे. कॉस्मेटिक, जेली चॉकलेट व्यतिरिक्त याचा खत म्हणूनही याचा वापर केला जाणार असल्याचेही डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.

लोकसंचलित साधन केंद्र रत्नागिरी यांच्यामार्फत जिल्हा आर्थिक विकास महामंडळाने या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता. केंद्रीय समुद्र मत्स्य संशोधन, मुंबई यांनी यासाठी रत्नागिरी येऊन स्थानिक २०० महिलांना या प्रकल्पाचे प्रशिक्षण दिले आणि सध्या दोन समुद्र किनारी या प्रकल्पाचा श्रीगणेशा केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular