28.5 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

महानिर्मितीच्या कामगारांच्या वेतनात गोंधळ, ८ ठेकेदारांना बजावली नोटीस

पोफळी येथील महानिर्मिती विभागात टेकेदापी पद्धतीने कार्यरत...

कोकणच्या समुद्रात पाकिस्तानची बोट, सर्व यंत्रणा सतर्क

कोकणच्या समुद्रात रविवारी रात्री एक संशयास्पद बोट...
HomeRatnagiriफिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे आनंदी अनुसया वृद्धाश्रमासाठी विशेष देणगी

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे आनंदी अनुसया वृद्धाश्रमासाठी विशेष देणगी

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे देण्यात आलेल्या या देणगीबाबत आश्रमाकडून व इतर सदस्य यांच्यातर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

रत्नागिरीमध्ये पावस येथे असलेल्या आनंदी अनुसया वृद्धाश्रमासाठी मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने मदत म्हणून सौर ऊर्जा प्रणाली संच प्रदान करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वीजेचा वाढता भार लक्षात घेता, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर केल्याने वृद्धाश्रमाच्या मासिक येणाऱ्या बिलामध्ये देखील फरक जाणवून खर्च कमी होणार आहे.

मागील अनेक काळापासून फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन या दोन्ही संस्था समाजाची सेवा करण्यासाठी ग्रामीण भागात आरोग्य सेवा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, शिक्षण, जलसंधारण, कौशल्य विकास कार्यक्रम व अनेक गरजू संस्थाना मदत करण्यासाठी अग्रस्थानी राहून या क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. निधीअभावी अनेक कामे कित्येक वर्षे अडून राहिलेली असतात पण अशा या समाजसेवी संस्थांमुळे अनेकांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होते.

समाजसेवा म्हणूनच मागील तीन वर्षापासून पावस येथील आनंदी अनुसया वृद्धाश्रमासाठी तेथील वृद्ध महिलांसाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या सेवा देण्याचे काम या दोन संस्था आपुलकीने करत आहेत. अगदी महिन्याला लागणारा जिन्नस माल, लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा, फिजीओथेरपी, वैद्यकीय उपकरणे पुरवणे हेही काम करते. यावेळी वृद्धाश्रमाच्या विनंतीनुसार त्यांना सौर ऊर्जा प्रणाली संच प्रदान करण्यात आला. यामुळे वृद्धाश्रमाच्या मासिक वीज बिलाचा खर्चात कपात होणार आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे देण्यात आलेल्या या देणगीबाबत आश्रमाकडून व इतर सदस्य यांच्यातर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला पावस ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच श्री प्रवीण शिंदे, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे जनरल मॅनेजर श्री.संजय कुलकर्णी, सौ. चव्हाण, श्री. गांगण, तसेच सदस्य व आश्रमाचे सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular