26.1 C
Ratnagiri
Monday, September 8, 2025

जागा खरेदीसाठीही मिळणार घरकुल योजनेतंर्गत आर्थिक मदत

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे...

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षक भिंत कोसळली; सीएनजीचा पुरवठा बंद

मंडणगड मधील एचपीसीएल कंपनीच्या नोबेल ऑटो पेट्रोल...

रत्नागिरी पॅसेंजरसाठी २ ऑक्टो. ला जल फाऊंडेशनचे लाक्षणिक उपोषण

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्य...
HomeRatnagiriरत्नागिरी तालुक्यात आज चार ग्रामपंचायत निवडणूकांसाठी मतदान

रत्नागिरी तालुक्यात आज चार ग्रामपंचायत निवडणूकांसाठी मतदान

चरवेली ग्रामपंचायत बिनविरोध झाली. शिरगाव, फणसोप आणि पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे.

महाराष्ट्रामध्ये आज ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. राज्यातील विविध १८ जिल्ह्यांमधील ८२ तालुक्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. एकूण १ हजार १६५ ग्रामपंचायतींसाठी या निवडणूका होणार आहेत. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वाशिम, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायती समाविष्ट आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आज १६ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. तीन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी ९ उमेदवार रिंगणात उभे आहेत, तर सदस्य पदाच्या ४६ जागांसाठी ९६ उमेदवार आमनेसामने आहेत. आज तीन ग्रामपंचायतीमध्ये १९ मतदान केंद्रांवर १७ हजार ८२९ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ९ हजार ४७ स्त्रीया आणि ८ हजार ७८२ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

रत्नागिरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी चरवेली ग्रामपंचायत बिनविरोध झाली. शिरगाव, फणसोप आणि पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे. शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत तर सदस्य पदाच्या १७ जागांसाठी ४१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. शिरगावमध्ये ११ मतदान केंद्रावर १० हजार ३९४ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ५ हजार २५० स्त्रीया आणि ५ हजार १४४ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

फणसोप ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. सदस्य पदाच्या ११ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत. फणसोप ग्रामपंचायतीमध्ये ४ केंद्रांवर ३ हजार ६२८ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये १ हजार ८९३ स्त्रीया आणि १ हजार ७३५ पुरुष मतदार आहेत.

पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. सदस्य पदाच्या ११ जागासाठी ३१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये ४  मतदान केंद्रांवर हजार ८०७ मतदार आपला हक्क बजावतील, त्यामध्ये १  हजार १०४  स्त्रीया आणि १ हजार १०३ पुरुष मतदार आहेत

RELATED ARTICLES

Most Popular