रत्नागिरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या ४७ जागांसाठी १२५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. रत्नागिरी तालुक्यातील चरवेली, फणसोप, पोमेडी खुर्द आणि शिरगाव या चार ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी चरवेली ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदांच्या ७ जागांसाठी ८ अर्ज, सरपंच पदासाठी एक अर्ज प्राप्त झाला आहे.
फणसोप ग्रामपंचायतीत सदस्यपदाच्या ११ जागांसाठी २८ उमेदवारांचे अर्ज आणि सरपंच पदाच्या जागेसाठी २ अर्ज प्राप्त झाले आहेत. पोमेंडी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या ११ जागांसाठी ३७ उमेदवारांचे अर्ज आणि सरपंच पदासाठी ४ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तर शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या १७ जागांसाठी ५२ उमेदवारांचे अर्ज आणि सरपंच पदासाठी ४ अर्ज प्राप्त झाले आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी करण्यात आली. छाननीअंती सरपंच पदाच्या ११ उमेदवारी अर्जांपैकी सर्वच अर्ज वैध ठरले आहेत. सदस्य पदासाठी आलेल्या १२५ अर्जांपैकी ९ अर्ज अवैध ठरले आहेत. ११६ अर्ज वैध ठरले आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील चरवेली, फणसोप, पोमेंडी बुद्रुक आणि शिरगाव या चार ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. थेट सरपंच पदासाठी आलेले हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत. आता ४ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणामध्ये आहेत.
ग्रामपंचायत सदस्य पदाच्या चारही ग्रामपंचायतींमध्ये मिळून ४६ जागांसाठी १२५ उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी ९ अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे एक प्रकारे हि ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे निष्पन्न होत आहे.