30.4 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriरत्नागिरी एसटी बसस्थानकाच्या रखडलेल्या हायटेक प्रकल्पाचा, लवकरच पुन:श्च श्रीगणेशा

रत्नागिरी एसटी बसस्थानकाच्या रखडलेल्या हायटेक प्रकल्पाचा, लवकरच पुन:श्च श्रीगणेशा

गेली चार वर्षे रखडलेल्या येथील हायटेक एसटी बसस्थानकाचा प्रकल्प लवकरच सुरू होण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनीही विशेष लक्ष घातले आहे.

मागील चार वर्षापासून, ठप्प झालेले एसटी बसस्थानकाच्या हायटेक प्रकल्पाचे काम अखेर सुरु होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दोन वर्ष कोरोनाचा फटका या बांधकामाच्या कामाला बसला. त्यानंतर रेंगाळलेल्या या कामाला अजून गती मिळालेलीच नाही. जनता अनेक वर्ष या हायटेक बसस्थानकाची वाट बघत आहे. परंतु, हा १० कोटींचा नूतन बसस्थानकाचा प्रकल्पाच्या कामातील विघ्ने काही संपण्याचे नाव घेत नाहीत.

गेली चार वर्षे रखडलेल्या येथील हायटेक एसटी बसस्थानकाचा प्रकल्प लवकरच सुरू होण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनीही विशेष लक्ष घातले आहे. ठेकेदाराला वाढीव फरक देण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शविली असून, काही कामगार लावून प्राथमिक कामाचा श्रीगणेशा केल्याचा दावा एसटी प्रशासनाने केला आहे. ठेकेदाराची मागणी आणि त्यानंतर घडलेल्या विविध राजकीय घडामोडींच्या हस्तक्षेपामुळे रखडलेले हे काम पुढच्या महिन्यात सुरू होणार असल्याचे एसटी विभागाने दिली आहे.

सुरुवातीला हायटेक बसस्थानकाच्या प्रकल्पाचे सादरीकरण तत्कालीन पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर झाले. आराखड्यात काही त्रुटी निघाल्या होत्या. शॉपिंग सेंटर किंवा व्यापारी गाळे आत ठेवण्याऐवजी दर्शनी उभारून एसटी आत आणि बाहेर जाण्यासाठी मार्ग करण्याचे सुचविण्यात आले आहे. त्यानुसार नवीन आराखडा करून प्रकल्पाच्या काम सुरू करण्यात आले. कोल्हापूरच्या ठेकेदाराला याचा ठेका देण्यात आला. सुरुवातीला काम चांगल्या गतीने सुरू होते.

पण त्यानंतर ते जे रेंगाळले ती परिस्थिती अजून जैसे थे च आहे. त्यामुळे एसटी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना उन्हात थांब्यावर उभे राहावे लागत असल्याने वाद निर्माण होत आहेत. प्रसार माध्यमांनी हा विषय उचलून धारल्यानंतर खासगी तत्वावर एक प्रवासी निवारा शेड तिथे उभारण्यात आली.

एसटी पार्किंगसाठी पालिकेकडे मागण्यात आलेली जागा देखील पालिकेने नाकारली. त्यामुळे कामाच्या ठिकाणीच गाड्या पार्किंग करून ठेवल्या जाऊ लागल्या. त्यानंतर बांधकामाची गंती मंदावली. अखेर तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून सामंत यांनी स्वतः कामाची पाहणी करून लवकरच यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

Most Popular