22.4 C
Ratnagiri
Monday, January 30, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeEntertainmentदबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा झाली एंगेज, पण साथीदार अजून सस्पेन्समध्ये

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा झाली एंगेज, पण साथीदार अजून सस्पेन्समध्ये

सोनाक्षीने फार गाजावाजा न करता अचानक चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

बॉलीवूड सुंदर अभिनेत्री दबंग गर्ल सोनाक्षीने साखरपुडा केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.  अभिनेत्री सोनाक्षीने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिचे काही फोटो शेअर केल्याने चर्चेला उधाण आले. तिने एका फोटोत आपली अंगठी दाखवलीय. त्यामुळे सोशल मीडिया युजर्सनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोनाक्षीने फार गाजावाजा न करता अचानक चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

सोनाक्षी साखरपुड्याच्या चाहत्‍यांना आनंद झाला आहे. पण अभिनेत्रीची पोस्ट पाहिल्यानंतर त्यांना उत्सुकता लागून राहिली आहे की, तो लकी बॉय कोण आहे, ज्याला अभिनेत्रीने आपला साथीदार बनवण्‍याचा निर्णय घेण्‍याचा आहे. दबंग गर्ल सोनाक्षी हिने शेअर केलेल्या फोटो मध्ये तिची एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसत आहे. सोनाक्षीचा मित्र, फियान्से तिचा हात धरताना दिसत आहे. मात्र, सोनाक्षीचा लाडका जोडीदार कोण आहे, यावर अद्याप पडदा कायम होता, आणि तो अद्यापही आहे. कारण, फोटोंमध्ये फक्त दोघांचा हात दिसतो आहे. चेहरा मात्र लपलेला दिसत आहे. सोनाक्षीने आपल्या पार्टनरसोबत रोमँटिक पोज दिल्या आहेत. म्हणून हे गुपित अजून उलगडलेले नाही.

तिने फोटो शेअर करताना लिहले आहे कि, तिचा सर्वात मोठा दिवस आहे. तिची स्वप्ने सत्यात उतरत आहेत. मी हे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही,  असे तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. एकापाठोपाठ एक असे तीन फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. त्याच कॅप्शनमध्ये सोनाक्षीने तिचा उत्साह आणि आनंद व्यक्त केला आहे. अनेक सेलिब्रिटीनी देखील तिच्या फोटोवर कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular