“रत्नागिरी, संगमेश्वर मतदार संघातून मी नेहमीप्रमाणे निवडणुकीला उभा रहाणार आहे आणि येथील माझे बंधू भगिनी मला विश्वासाने व आपुलकीने पुन्हा निवडून देणार आहेत यात तीळमात्र शंका नाही. समोर प्रतिस्पर्धी उमेदवार कोण याचा मी कधीच विचार केला नाही कारण येथील माझे बांधव मला विजयी केल्याशिवाय राहणार नाहीत” असे जोषपूर्ण प्रतिपादन रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी केले. उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झाली असून ते शुक्र. दि. २५ रोजी आपला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.
कोकणचे भाग्यविधाते ! – ना. उदय सामंत यांनी कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद भूषविले असून त्यांच्या कार्याचा आवाका लक्षात घेऊन त्यांना ‘कोकणचे भाग्यविधाते’ म्हणून ओळखले जाते. या तीनही जिल्ह्यांतील विकासाचे थबकलेले गाडे वेगाने दौडावे यासाठी त्यांनी विलक्षण कल्पकतां दाखविली व प्रचंड मेहनत घेतली.
भगवान श्रीकृष्णांचा संदेश – ते रत्नागिरीत आले असता पत्रकारांनी त्यांच्याशी बातचीत केली त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, “मी माझ्या बंधू भगिनींसाठी सदैव काम करीत असतो. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की फलाची अपेक्षा न करता कार्य करीत रहा… मी तसेच करतो. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत येथील माझे बंधू भगिनी मला मोठ्या मताधिक्क्याने विजयी करतात” असे त्यांनी विनम्र शब्दात नमूद केले.
सदैव विजयी करतात ! – ना. उदय सामंत विलक्षण तडफ ने बोलत होते. त्यांनी सांगितले, “निवडणुकीत समोर कोण उमेदवार आहेत याची मी कधीच चिंता केली नाही. निवडणुकीला कुणीही उमेदवार असले तरी येथील मतदार बांधव मलाच विजयी करतात. मतदारांचे भक्कम पाठबळ असल्याने मी सदैव विजयी झालो” अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली.
सलग ४ वेळा विजयी ! – त्यांनी सांगितले, “येथील माझ्या मतदार बंधू भगिनींनी मला एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल ४ वेळा चढत्या मताधिक्क्याने विजयी केले. माझे मतदार बांधव माझ्या पाठीशी ठामपणे असल्याने मी अनेक उच्च पदांवर कार्य करु शकलो. माझ्या मतदार बांधवांनी माझ्यावर विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्याचा मी सदैव आटोकाट प्रयत्न केला” अशा शब्दात त्यांनी मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
२७ वर्षांची तपश्चर्या – ना. उदय सामंत तळमळीने बोलत होते. त्यांनी सांगितले, “मी २७ वर्षांपूर्वी एक साधा कार्यकर्ता म्हणून येथील मतदार बंधू भगिनींसाठी कार्य करु लागलो. मी साधा कार्यकर्ता म्हणून काम करु लागलो तेव्हा हा मतदारसंघ एक दुर्गम व अविकसीत विभाग म्हणून ओळखला जात असे”.
झेप घेण्यास सज्ज! – “त्यानंतर सलग ४ वेळा येथील माझ्या बंधू भगिनींनी मला निवडून दिले व मला सेवा करण्याची संधी दिली. २० वर्षांपूर्वीचा रत्नागिरी, संगमेश्वर मतदार संघ व आजचा मतदार संघ यात तुम्हाला जमीन अस्मानाचा फरक जाणवेल… विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात माझा मतदार संघ झेप घेण्यास सज्ज झाला आहे” असे त्यांनी भरल्या मनाने सांगितले.
वर्षानुवर्षे परीश्रम – ना. उदय सामंत तडफेने बोलत होते. त्यांनी सांगितले, “दुर्गम व डोंगराळ समजल्या गेलेल्या मतदार संघाचा विकास करायचा तर ‘जादूची कांडी’ फिरवून तो होत नसतो. त्यासाठी प्रचंड नियोजन, कल्पकता, दूरदृष्टी व अथक परीश्रम आवश्यक असतात. असे वर्षानुवर्षे प्रयत्न होतात तेव्हा त्या विभागाचा कायापालट होत जातो” असे त्यांनी स्पष्ट केले.
जणू चिकाटीची परीक्षा ! – ना. उदय सामंत सोप्या शब्दात समजावून देत होते. त्यांनी सांगितले, “एखादा प्रकल्प उभा करायचा तर प्रथम त्याचे सव्र्व्हेक्षण होते, प्रकल्प अहवाल तयार होतो, तो मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येतो, त्याला शासनाची मंजुरी मिळते, त्यानंतर अंतिम एस्टीमेट तयार होते व मग संबंधित खाते निविदा काढून प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होते… अशी ही वेळखाऊ, किचकट व चिकाटीची परीक्षा घेणारी कार्यपद्धती असते” असे त्यांनी सोप्या शब्दात सांगितलेः
‘खोडे’ घातले जातात – ना. उदय सामंत भावविभोर झाले होते. त्यांनी सांगितले, “हे सारे वर्षानुवर्षे करावे लागते, प्रत्येक प्रकल्पासाठी करावे लागते. त्यातच ‘लाल फीत’ नावाचा जो प्रकार आहे तो विलक्षण हैराण करणारा असतो. अनेकदा ‘खोडे’ घातले जातात… शांत चित्ताने ते निस्तरावे लागतात… हे सर्व करता करता खूप कालावधी जातो, परंतु चिकाटीने व संयमाने निभावून न्यावे लागते” अशा संयमी शब्दात त्यांनी सारे कथन केले.
संधी मिळावी लागते – ना. उदय सामंत यांनी सांगितले, “अशातच प्रत्येक वेळी आपल्याला संधी मिळेलच असे नसते. मी सुरुवातीला अनेक वर्षे केवळ आमदार म्हणून कार्य केले. त्यानंतर मी तंत्रशिक्षण खात्याचा मंत्री झालो. केवळ २ वर्षांपूर्वी मी उद्योगमंत्री झालो आणि मग मला या माझ्या मतदार संघासाठी उद्योग आणणे शक्य झाले” असा सारा लेखाजोखा त्यांनी जणू सादर केला.
हजारो युवकांना रोजगार – ना. उदय सामंत यांनी सांगितले, “मी उद्योगमंत्री झाल्यावर बड्या उद्योगपतींना माझ्या विभागात मोठे उद्योग आणण्यास प्रवृत्त केले, मंजुरीचे सारे सोपस्कार पूर्ण करुन दिले आणि – मगच आता रत्नागिरी, संगमेश्वरमध्ये अजस्त्र प्रकल्प येण्याचा मार्ग मोकळा झाला. नजिकच्या काळात हे मोठे प्रकल्प उभे राहतील व येथील हजारो युवकांना रोजगार मिळतील”.
इन्फ्रास्ट्रक्चर विकसीत – “अनेक मोठ्या ‘बिग बजेट’ प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे. आता त्यांची उभारणी सुरु झालेली दिसेल. एखाद्या अविकसीत विभागाचा विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करताना सर्वच बाबी विचारात घ्याव्या लागतात. आरोग्य सुविधा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, मेडिकल कॉलेज, शैक्षणिक सुविधा, इंजिनिअरिंग कॉलेज हे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ विकसीत झाले आहे” असे त्यांनी नम्रपणे नमूद केले.
चौफेर विकास सुरु ! – ना. उदय सामंत यांनी सांगितले, “त्याचबरोबर पर्यटन विकास, स्मार्ट सिटी प्रकल्प, मच्छी व्यवसाय व बंदरे विकास, आंबा, काजू शेतकऱ्यांसाठी योजना, रस्ते विकास, प्रशासकीय सुविधा, शहरातील तसेच गावा गावातील पाणी पुरवठा योजना, त्यासाठी धरणे अशा सर्वच बाबींचे नियोजन करावे लागते व त्यासाठी वर्षे घटवावी लागतात” याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आता ‘बरकत’ येणार – ना. उदय सामंत यांनी सांगितले, , “अर्थात त्यासाठी कालावधी लागतो, नियोजन, संयम व परीश्रम घ्यावे लागतात. हे सर्व आम्ही मागील काही काळात केले. म्हणूनच आता प्रत्यक्ष विकास कामांना सुरुवात झालेली पहावयास मिळत आहे… या विकासामुळे येथील भूमीला ‘बरकत’ येईल व या विकासाची फळे येथील बंधू भगिनींना नजीकच्या काळात चाखावयास मिळतील” अशा शब्दात त्यांनी जणू ‘चौफेर’ विकासाची रुपरेषा स्पष्ट केली.