28.8 C
Ratnagiri
Monday, February 3, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriजास्त बाधित गाव/वाडी ठरणार उद्रेकजन्य

जास्त बाधित गाव/वाडी ठरणार उद्रेकजन्य

रत्नागिरीमध्ये कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासन मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागामध्ये प्रभाव जास्त प्रमाणात झाल्याने रोजच्या बाधितांची संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. गावागावातून सरसकट चाचण्या वाढवून देखील दररोज सापडणारे बाधित पाचशेच्या दरम्यान असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

त्यामुळे कोरोनावर नियंत्रण राखण्यासाठी जिथे अधिक बाधित केसेस सापडणारी गावे, वाड्या आहेत, त्यांना  उद्रेकजन्य म्हणून जाहीर करुन ती कोरोना प्रतिबंधित क्षेत्र केली जात आहेत. तो भाग चौदा दिवस कंटेनमेंट केला जात आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांच्यामार्फत ही गावे उद्रेकजन्य म्हणून जाहीर केली जात आहेत.

रत्नागिरी तालुक्यात नऊ गावे उद्रेकजन्य आहेत. त्या भागात कोरोना प्रतिबंधीत क्षेत्रातील नियम लागू राहणार आहेत. या गावातील अत्यावश्यक सेवाच कार्यरत राहणार आहेत. बाधित भागातील सर्व लोकांच्या सरसकट चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर सुद्धा निगेटीव्ह लोकांची संख्या पाहूनच निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले गेले आहे.

राज्यातील सात जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील निर्बंध शिथिल करू नये अश सूचना दिल्या आहेत. जिल्ह्याच्या केलेल्या मायक्रो नियोजनावर जास्तीत जास्त प्रमाणात भार दिला जाणार आहे. ज्यामध्ये पॉझिटीव्हीटी दर ५% च्या खाली आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ट्रेसिंग करून जे जे कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले आहेत, अशांचा शोध घेऊन चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाधितांचा शोध घेण्यासाठी प्रशासन जोमाने कामाला लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular