25.6 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeRatnagiriअँब्युलंसचे दरपत्रक जाहीर

अँब्युलंसचे दरपत्रक जाहीर

कोरोनाच्या या कालावधीमध्ये अशा अनेक घटना समोर येतात, कि वाटते मनुष्य माणुसकी पण विसरत चालला आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे संसर्गित रुग्ण आणि होणारे मृत्यूचे प्रमाणही वाढतच आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे अंतिमसंस्कार शासकीय नियमावली प्रमाणे करण्यात येतात. त्यामध्ये ने-आन करण्यासाठी अँब्युलंसची आवश्यकता भासते. रुग्णालयामधून थेट शव स्मशानभूमीमध्ये नेण्यात येते आणि पीपीई कीट घातलेले कर्मचारी त्याचे अंतिम संस्कार करतात, किंवा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना पीपीई कीट घालून अंत्यसंस्काराची परवानगी दिली जाते.

मागिल काही आठवड्यामध्ये अँब्युलंस चालक मालकांच्या मुजोर वागणुकीबद्दल अनेक प्रकाराने कानावर येत आहेत. वाढीव भाडे आकारणी करणे, जास्तीच्या भाड्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची अडवणूक करणे, अरेरावीची  भाषा वापरणे, धमकीवजा बोलणे अशा अनेक घटना अनेक जिल्ह्यातून समोर आल्या आहेत. त्यामुळे एखाद्या अशा अँब्युलंस चालकामुळे बाकीच्या प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अँब्युलंस चालकांवर ठपका बसतो, त्यामुळे सामान्य जनतेची अँब्युलंस चालकांकडून होणाऱ्या लूटीपासून सुटका व्हावी यासाठी पोलीस विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष पुढाकार घेतला आहे़.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून रुग्णवाहिकांसाठी निश्चित दरपत्रक ठरवून घेतले असून,  हे दरपत्रक रुग्णवाहिकेत लावणे बंधनकारक केले आहे़, तसेच ठरलेल्या दरापेक्षा वाढीव दराने कोणी मागणी करून जनतेची लूट केली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मेडसीकर यांच्या उपस्थितीत दरपत्रक लावण्यात आले. हे सर्व दरपत्रक जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, प्राथमिक केंद्रांवरही बसविण्यात येणार आहे, जेणेकरून सर्वाना या दरपत्रकाची माहिती होईल. या दरपत्रकानुसार जर कोणत्याही रुग्णवाहिकेने दर आकारले नाहीत किंवा जादा दर घेतले तर त्यांची त्वरित तक्रार करण्याचे आवाहनही केले आहे.

लांजा तालुक्यामध्येही भाजपच्या वतीने गटनेते नगरसेवक संजय यादव यांनी तहसिलदार गायकवाड यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते. कोरोना संक्रमणाचा जनतेच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला असून, जनतेची अशा प्रकारे चाललेली आर्थिक पिळवणूक थांबवण्याची मागणी त्यामध्ये केली होती. त्यांच्या मागणीला काही प्रमाणात यश मिळाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular