27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeKhedतरूणाच्या फोटोशी छेडछाड करत धमक्या देत ब्लॅकमेलींग

तरूणाच्या फोटोशी छेडछाड करत धमक्या देत ब्लॅकमेलींग

फसवणूक करून बनविण्यात आलेल्या अश्लील फोटोमुळे बदनामी होण्याच्या भीतीमुळे तरुणाने पोलिसांची मदत घेतली.

ऑनलाइन फसवणुकीच्या गर्त्यामध्ये तरुणांपासून ते वयोवृध्द नकळत अडकले जातात. अनेक वेळा बँकेच्या फसव्या स्कीम्स, नोकरी देतो, पैसे डबल करणाऱ्या स्कीम्स अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडून अनेक जण यामध्ये फसतात. खेड मधील एका तरुणासोबत सुद्धा अशीच घटना घडली आणि त्यावरून त्याला ब्लॅकमेल करण्यात येत होते.

एका संस्थेमार्फत सुलभ कर्ज देतो असे सांगून तरूणाकडून ऑनलाईन घेण्यात आलेल्या कागदपत्र व फोटोंचा गैरवापर करण्यात आला. त्या तरूणाच्या फोटोशी संगणकावर छेडछाड करत त्याचे अश्‍लील फोटो तयार करून त्याला धमक्या देत ब्लॅकमेल करण्यात आल्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

इंटरनेटमुळे अनेक कंपन्या आपल्या जाहिराती विविध मोबाईल ऍपच्या माध्यमातून करत आहेत. झटपट आणि सुलभ कर्ज देणार्‍या जाहिराती सध्या मोठया प्रमाणावर येत आहेत. अशाच एका पाच हजार ते एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार्‍या कंपनीमार्फत खेडमधील एका तरूणाने आपला फोटो व आधारकार्डची प्रत देवून कर्ज घेतले होते. मात्र त्या तरूणाच्या फोटोचा गैरवापर करून अज्ञात इसमाने अश्‍लिल फोटो तयार केले व ते फोटो सोशल मिडियावर पसरवून बदनामी करण्याची धमकी देत त्या तरूणाकडे पैशांची मागणी केली.

फसवणूक करून बनविण्यात आलेल्या अश्लील फोटोमुळे बदनामी होण्याच्या भीतीमुळे तरुणाने पोलिसांची मदत घेतली. ऑनलाईन कर्जासाठी दिलेल्या कागदपत्र आणि फोटोचा गैरवापर केल्याने, संबंधित तरूणाने खेड पोलीस ठाण्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्याकडे तक्रार केली आहे. आणि लवकरात लवकर संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular