राज्यातील विविध कारागृहांमध्ये सुमारे ६५५ परदेशी नागरिक विविध गुन्ह्यांखाली शिक्षा भोगत आहेत; परंतु याला रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृह अपवाद आहे. या कारागृहात एकही परदेशी कैदी नाही. विविध गुन्ह्यांमध्ये सामाविष्ट असलेले २५० कैदी शिक्षा भोगत आहेत. यामध्ये १३ महिला कैद्यांचाही समावेश आहे. कारागृह प्रशासनाने याला दुजोरा दिला. राज्यातील कारागृहांत सध्या ६५५ परदेशी नागरिक विविध गुन्ह्यांसाठी कैदी शिक्षा भोगत आहेत. यात ५४४ पुरुष आणि ११० महिला आणि एका तृतीयपंथी कैद्याचा समावेश आहे. मुंबईतील आर्थररोड कारागृहात सर्वाधिक २३८ परदेशी कैदी आहेत. आर्थररोड कारागृहात खटलाधीन परदेशी नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.
सर्वांत कमी परदेशी कैद्यांची संख्या असलेल्या कारागृहांत वर्धा जिल्हा कारागृह, अमरावती मध्यवर्ती कारागृह, नांदेड जिल्हा कारागृह, नाशिक रोड नेपाळ, झिम्बाब्वे आणि नायजेरिया या देशांतील ६५५ कैदी असल्याची माहिती राज्याच्या तुरूंग विभागाने दिली. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, कोलंबिया, ब्राझिल, पाकिस्तान, केनिया, इटली, बांग्लादेश, इंडोनेशिया, श्रीलंका, इराण, थायलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील कैद्यांवर देशविरोधी कृत्ये केल्याचा आरोप आहे. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंडोनेशिया, नायजेरिया येथील नागरिकांवर फसवणूक, आर्थिक गुन्हे आणि अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे आहेत. रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृह याला अपवाद ठरले आहे. कारागृहात २५० कैदी आहेत. त्यामध्ये १३ महिला कैद्यांचा समावेश आहे; परंतु या सर्वांमध्ये एकही परदेशी कैदी नसल्याचे तुरूंग अधिकाऱ्यांनी सांगितले.