24.4 C
Ratnagiri
Monday, November 24, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriजागतिक पर्यावरण दिनाची खास बात

जागतिक पर्यावरण दिनाची खास बात

आज ५ जून, जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. निसर्गात विविध प्रकारची रंगांची, आकाराची, झाडे, फळे,फुले अस्तित्वात असतात. अनेक शास्त्रज्ञ असे अनेक शोध घेत असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधील जैतापूर परिसरामध्ये अशा प्रकारच्या एका तुळशीच्या प्रजातीचा शोध लावण्यात महाविद्यालयातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी वर्गाला यश मिळाले आहे.

राजापूरमधील आबासाहेब मराठे महाविद्यालयातील प्रा. डॉ. अरूण चांदोरे, त्यांचे संशोधक विद्यार्थी देवीदास बोरूडे, दक्षिण कोरियाच्या जीवरसायनशास्त्र विभागाचे डॉ. तांबोळी, प्रा. डॉ. गोविंदराव, नाशिक येथील व्ही. एन. नाईक महाविद्यालयाचे प्रा.घोलवे इत्यादींनी मिळून या कातळावर फुलणाऱ्या फुल वनस्पतीचा शोध लावला आहे. ही वनस्पती जांभळ्या रंगाच्या मंजिऱ्या असलेली तुळशीवर्गीय प्रजातीमधील वनस्पती असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

Ratnagiri Jaitapur Professors New Invention

या वनस्पतीचा शोध जैतापूर गावामध्ये झाल्यामुळे तिचे नामकरण गावाच्या नावावरूनच करण्यात आले आहे. संशोधकांनी जांभळी मंजिरीवर्गीय पोगोस्टेमॉन जैतापूरेंनसींस चांदोरे व एस. आर. यादव  या नव्या जागतिक स्तरीय फुलवनस्पतीचा शोध लावला आहे. या वनस्पतीच्या विविध प्रकारच्या प्रजाती असून, त्यावर विविध संशोधन सुरु आहे. या फुलवनस्पतीच्या संशोधनासाठी ५ वर्षांचा दीर्घ कालावधी लागला असून त्यासाठी कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा.डॉ.एस.आर.यादव,राजापूर आबासाहेब मराठे विद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.जी.पवार, प्रा.एस.जी.मेंगाळ, डॉ.विनोदकुमार गोसावी, शरद कांबळे, नंदकुमार साळुंके इत्यादी सहकार्यांसह भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन मंडळाचे देखील विशेष सहकार्य लाभले. न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या या फुलवनस्पतीचे संशोधन फायटोटॅक्सा  या जागतिक स्तरीय नियतकालिकामधून मागील आठवड्यामध्ये प्रकाशान करण्यात आले आहे. जैतापूर मध्ये २०१५ साली ही फुलवनस्पती प्रथम संशोधकांच्या दृष्टीस पडली. त्यानंतर तिच्यावर घेतलेले शोध, केलेला अभ्यास आणि संशोधनानंतर या फुलवनस्पतीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने संशोधकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular