26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriकहाणी सफेद कावळ्याची

कहाणी सफेद कावळ्याची

कावळा आणि सफेद रंगाचा ! बातमीचे शीर्षक थोडे आश्चर्यकारकचं आहे. पण रत्नागिरीमधील काळबादेवी गावामध्ये काळ्या रंगाच्या कावळ्याबरोबर एक शुभ्र सफेद रंगाचा कावळा दृष्टीस पडला आहे.  प्रत्येक प्रजातीच्या पक्षांच्या पिसांमध्ये एक तरी पांढरे पीस असतेच. पांढरा कावळा ही कोणतीही कावळ्याची नवीन प्रजाती नसून, शरीरातील काही द्रव्यांच्या कमतरतेमुळे या कावळ्याचा रंग सफेद राहिला आहे असे काही तज्ञांनी सांगितलेल्या माहितीमुळे कळले आहे.

रत्नागिरी मधील काळबादेवी गावात शेट्ये वाडीमध्ये शेखर शेट्ये यांना हा सफेद कावळा नजरेस पडला. सुरुवातील कबुतराची कोणती तरी प्रजाती असेल असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. पण मागील चार दिवसापासून कोंबड्यांना अन्न टाकताना येणाऱ्या या पक्षाचे त्यांनी नीट निरीक्षण केले असता, त्याचा आवाज ऐकला असता त्यांना तो सफेद रंगाचा कावळाच असल्याचे स्पष्ट झाले. कोणत्याही इतर प्रजातीचे  प्राणी अथवा पक्षी एकत्रित येऊन टाकलेले दाणे खात नाहीत, गटाने असलेले पक्षी त्याला लगेच तिथून हमला करून हुसकावून लावतात, अगदी दूर जाईपर्यंत त्या वेगळ्या पक्षाची पाठ सोडत नाहीत. पण हा पक्षी इतर कावळ्यांमध्येच दाणे टिपताना दिसला. म्हणून त्यांनी कुतूहलापोटी आणि इतर सर्वाना सुद्धा सफेद कावळा पाहता यावा यासाठी त्या कावळ्याचे काही फोटो आणि व्हिडियो देखील सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

निसर्गामध्ये आपण वेगवेगळ्या रंगाचे, आवाजाचे पक्षी पाहतो. पिसांच्या विविध रंगछटा पाहताना मन त्यामध्ये गुंतून जाते. पक्षांचे रंग हे त्यांच्या शरीरातील असणार्या रंगद्रव्यावरून ठरतात. जसे मानवामध्ये मेलानिनच्या कमी जास्त प्रमाणानुसार रंग काळा, सावळा, गव्हाळ, पांढरा, अति पांढरा असे वर्गीकरण केले जाते. तसाच काहीसा प्रकार पक्ष्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. रंगद्रव्ये ही प्राणी आणि वनस्पती मध्ये आढळणारे रंगीत पदार्थ असतात. या रंगद्रव्याचा वापर विशेषत: पक्षांमध्ये असणाऱ्या लाल रंगामध्ये आढळतो. पक्षांमध्ये सुद्धा असणारी रंगांची विविधता ही मेलानिन या रंग द्रव्यामुळेचं ठरते. त्याचे असणारे कमी अधिक प्रमाणामुळे अशा प्रकारचे रंगांचे बदल जाणवतात, जसा कि हा सफेद कावळा.  त्यामुळे सध्या सर्व रत्नागिरीमध्ये या दुर्मिळ सफेद कावळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular