31 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriतर... रत्नागिरीकरांसाठी पुन्हा एकदा केस अंगावर घेऊ आणि उग्र आंदोलन करू -...

तर… रत्नागिरीकरांसाठी पुन्हा एकदा केस अंगावर घेऊ आणि उग्र आंदोलन करू – अ‍ॅड. बंटी वणजू

मंत्र्यांनी आणि खासदारांनी मुंबई गोवा हायवे मधील स्वतःच्या इमारती जश्या वाचवल्या तसेच मारुती मंदिरही न हलवता तिथेच ठेवण्याचा आदेश शासनाकडून पारित करून घ्यावा.

रत्नागिरी शहरातील मध्यवती भाग म्हणून ओळख असलेले मारुती मंदिर परिसर सर्वज्ञात आहे. मारुती मंदिरचा मारुतीरायाचे कुठेतरी स्थलांतर करणार असल्याचे वृत्त कानावर येत आहे. समस्त रत्नागिरीतील शेकडो भाविकांची श्रद्धा असलेला हा देव कुठेही जाणार नाही आणि कुणी हलवण्याचा प्रयत्न केला तर संपुर्ण रत्नागिरीकरांना घेऊन उग्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अ‍ॅड बंटी वणजू यांनी प्रशासनाला दिला आहे. तो तिथून कसा हलवतात ते आम्हीही बघतो असा सज्जड इशाराच वणजू यांनी दिला आहे.

मंत्र्यांनी आणि खासदारांनी मुंबई गोवा हायवे मधील स्वतःच्या इमारती जश्या वाचवल्या तसेच मारुती मंदिरही न हलवता तिथेच ठेवण्याचा आदेश शासनाकडून पारित करून घ्यावा. आताच्या सरकारकडून रत्नागिरीमध्ये अनेक कामे अपूर्णच आहेत. कोकणासाठी काही करायचे म्हटले कि, शासनाचा हाथ कायम आखडता असतो.

अनेक वर्षापासून रखडलेले एसटी स्टॅन्ड असेल, न चालु झालेले विमानतळ असेल किंवा न येणारे नवीन उद्योग हे आणि शहरातील अनेक प्रश्न अजुन बाकी असताना नको असलेली काम करून त्यातून फायदा मिळवण्याचा नवीन उद्योग नगरपरिषदेने काढला आहे का? असा थेट सवाल ही अ‍ॅड. बंटी वणजू यांनी प्रशासनाला केला आहे.

रत्नागिरी शहराची शान असलेलं आणि पूर्वीपासून जी रत्नागिरी शहराची हद्द दाखवण्यात आलेली आहे ते वेशीवरील मारुती मंदिर येथील मारुती चे मंदिर जर प्रशासनाने तिथून हलवण्याचा प्रयत्न केला तरी रत्नागिरीकरांसाठी पुन्हा एकदा केस अंगावर घेऊ आणि उग्र आंदोलन करू असा इशाराच अ‍ॅड. बंटी वणजू यांनी प्रशासनाला दिला आहे

RELATED ARTICLES

Most Popular