26.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरत्नागिरीकरांवर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी आर्जव करायची वेळ

रत्नागिरीकरांवर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी आर्जव करायची वेळ

एकतर वाढलेला उष्मा आणि त्यामध्ये सतावणारे पाण्याचे संकट त्यामुळे रत्नागिरीकरांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

रत्नागिरी तालुक्यात अजूनही पाणी पुरवठा योजनेसाठी रस्ते खोडून पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. सोमवारी पालिका विभागामध्ये अनेक ठिकाणी पाईपलाईन दुरुस्ती आणि डागडुजीची कामे सुरु असल्याने पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. त्या संबधीची आगाऊ सूचना देखील आदल्या दिवशी सोशल मिडियाच्या आधारे सुद्धा पाठविण्यात आलेली. एकतर वाढलेला उष्मा आणि त्यामध्ये सतावणारे पाण्याचे संकट त्यामुळे रत्नागिरीकरांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

रत्नागिरी नगर परिषदच्या नविन पाणी पाईप जोडणी साठी सोमवारी संपूर्ण रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा बंद होता. त्या नंतर मंगळवार आणि आज एकता मार्ग आणि राजापूरकर कॉलनी येथे पाणी पुरवठा अद्यापही सुरु करण्यात आलेला नव्हता. उष्णतेने हैराण झालेल्या जनतेला नगर परिषदेच्या अनियमीत पाणी पुरवठ्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक त्या त्या विभागातील नगरसेवक, लोकप्रतिनिधी देखील सध्या कार्यकाल संपल्याने निवांत असल्याने, पहायला गेलं तर त्यांनी देखील या गंभीर समस्येकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. सध्या नगरपरिषदेची निवडणूक पुढे गेल्याने माजी लोकप्रतिनिधी सध्या थंड आहेत. नगरपरिषदेच्या  संबंधित विभागाकडे तक्रार केली तरी त्याकडे संबंधित कर्मचारी वर्ग काम चालू आहे. अशी ठराविक उत्तरे देतात.

पालिकेच्या बऱ्याच महिन्यापासून सुरु असलेल्या आणि दुरुस्तीची कामे संपायचे नावच घेत नसल्याने, संपूर्ण शहराला हे नगर परिषदेचे पाणी प्रकरण मनस्तापाचे ठरत आहे, त्यामुळे भर उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना पाण्यासाठी आर्जव करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पालिकेने आणि लोकप्रतिनिधीनी देखील देखील वेळीच या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून त्यावर तोडगा काढावा.

RELATED ARTICLES

Most Popular