27.5 C
Ratnagiri
Saturday, April 20, 2024

सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, हल्लेखोरांनी घेतली होती खास ट्रेनिंग

सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींची मुंबई...

अमित शहांचा मान ठेवत एक पाऊल मागे – उदय सामंत

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी...

‘हर घर मशाल’ अभियानाच्या माध्यमातून चिपळुणात महाविकास आघाडीची एकजुट

भक्कम अशी एकजूट दाखवत महाविकास आघाडीने चिपळूणमध्ये...
HomeKhedअतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये सुविधांवर भर प्रदूषणविरहित कारखान्यांचे स्वागत

अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये सुविधांवर भर प्रदूषणविरहित कारखान्यांचे स्वागत

खेड तालुक्यातील अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये येणाऱ्या नव्या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रदूषणविरहित कारखाने आल्यास आम्ही स्वागत करू, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या एमआयडीसीमध्ये चारपदरी रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. लोटे एमआयडीसीपासून जवळ असलेल्या १३ गावांतील ५९० हेक्टर क्षेत्र अतिरिक्त लोटे एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आले आहे. लोटे एमआयडीसी केमिकल झोन म्हणून आरक्षित आहे. येथे रासायनिक आणि कृषी क्षेत्राशी निगडित अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांमुळे लोटे एमआयडीसीचा परिसर पूर्णपणे प्रदूषित झाला आहे. हवा आणि पाण्यातील प्रदूषणामुळे त्याचे दुष्परिणाम लोकांवरही जाणवू लागले आहेत. त्यामुळे अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये रासायनिक कारखाने नको, अशी स्थानिक लोकांची भूमिका आहे. अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये सध्या कोकाकोला, रेल्वेचे डबे बनवणें असे दोन मोठे प्रकल्प होणार आहेत.

रेल्वेचे डबे बनवण्याच्या कारखान्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कोकाकोलाचे काम प्राथमिक स्टेजवर आहे. गॅस आणि मासळीवर प्रक्रिया करणारे प्रकल्प या औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू झाले आहेत. एमआयडीसीकडून काही कारखानदारांनी अतिरिक्त लोटे एमआयडीसीमधील भूखंड ९९ वर्षाच्या करारावर घेतले आहेत. त्या ठिकाणी प्रदूषणविरहित कारखाने आले तरच आम्ही ते कारखाने सुरू करण्याची परवानगी देऊ अन्यथा रासायनिक कारखान्यांना आमचा विरोध असेल, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. यापूर्वी १३ भूखंड रासायनिक कारखानदारांनी घेतले होते. त्याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला. त्यामुळे अनेक रासायनिक क्षेत्रातील कारखानदार अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये येण्यास येण्यास इच्छुक नाहीत; मात्र पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे अधिकारी अतिरिक्त लोटे नवीन कारखानदारांना आणण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणीचे काम करत आहेत.

ग्रामस्थांनी एखाद्या प्रकल्पाला किंवा कामाला विरोध केला तर ग्रामस्थांचा गैरसमज दूर करण्याचे कामही स्थानिक….. अधिकारी करत आहेत. कारखानदारांना वीज, पाणी, रस्ते आणि इतर सुविधा मुबलक प्रमाणात देण्यासाठी एमआयडीसीचे प्रयत्न- सुरू आहेत. एमआयडीसीमध्ये एकूण १६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. यातील ४ किलोमीटरचा मुख्य रस्ता हा चौपदरी केला जात आहे. ३५ कोटी रुपये खर्च करून रस्ते उभारणीचे काम सुरू आहे. एमआयडीसीतील कारखानदारांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी उपायोजना सुरू आहेत. एमआयडीसीला पाणी देताना ग्रामस्थांनाही पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी एमआयडीसीकडून प्रयत्न सुरू आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular