31.2 C
Ratnagiri
Thursday, March 28, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriचालत्या गाडीपुढे स्वतःला झोकून देत तरुणाची आत्महत्या

चालत्या गाडीपुढे स्वतःला झोकून देत तरुणाची आत्महत्या

रेल्वेच्या धडकेत प्रणव हा जागीच गतप्राण  झाला आहे. कोकण रेल्वेचे ट्रॅकमन यांना सायंकाळी प्रणव याचा छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह ट्रॅकच्या बाजूला आढळून आला.

रत्नागिरी शहरामध्ये अनेक दिवसापासून खळबळजनक घटना घडत आहेत. जिल्ह्यात घडणारे गंभीर गुन्हे, चोऱ्या, निर्माण झालेली अशांतता आणि पोलिसांसमोर समोर निर्माण होणारे आव्हान हे सर्व धक्कादायक आहे. त्यामध्येच अनेक अशा घटना देखील घडत आहेत ज्यामुळे चित्त विचलित होते आहे.

रत्नागिरी शहराजवळील आरटीओ ऑफिसच्या जवळच्या रेल्वे पुलावर चालत्या गाडीपुढे स्वतःला झोकून देत एका तरुणाने आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ही घटना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रणव कृष्णा सनगरे वय २४, रा. टिके भातडेवाडी असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

रेल्वे ट्रॅकमॅन आपल्या कामावर कार्यरत होते त्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची बाब लक्षात येताच ट्रॅकमॅनने तात्काळ ही माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर शहर पोलिसांकडून घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात आला. मिळालेल्या माहितीमध्ये धक्कादायक गोष्ट समोर आली आहे कि, प्रणव याचे मागील मे महिन्यातच लग्न झालेले आणि त्यांचा प्रेमविवाह झाला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी प्रणव हा आरटीओ रेल्वे पुलावर वावरत होता. यावेळी येणाऱ्या कोच्चिवली भावनगर एक्स्प्रेस गाडीसमोर त्याने स्वतःला झोकून दिले. कुवारबाव रेल्वे ट्रॅकजवळ हा धडक बसलेला मृतदेह आढळून आला आहे. रेल्वेच्या धडकेत प्रणव हा जागीच गतप्राण  झाला आहे. कोकण रेल्वेचे ट्रॅकमन यांना सायंकाळी प्रणव याचा छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह ट्रॅकच्या बाजूला आढळून आला. त्यानुसार त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, प्रणव सनगरे याने हे आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले,  हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी अधिकचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गायकवाड करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular