22.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriरेल्वेमध्ये घडलेल्या लाखो रुपयांच्या चोरीच्या गुन्हेगारांना अटक

रेल्वेमध्ये घडलेल्या लाखो रुपयांच्या चोरीच्या गुन्हेगारांना अटक

सोने तपासणी करण्याचे होलमार्क मशिन खरेदी करण्यासाठी आपल्या जवळील बॅगमध्ये २७ लाख ८६ हजार रोख रक्कम घेउन जात होते.

रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे चोरीची ही घटना १ मे २०२२ रोजी घडली होती. निव्वळ आठवडाभरामध्ये रत्नागिरी पोलिसांनी मुद्देमालासह या चोरांना पकडण्यात यश मिळवले आहे. प्रशांत भिमराव माने आणि विनोद रावसाहेब महिम हे दोघे जामनगर तिरुवल्ली एक्सप्रेसने रत्नागिरी ते केरळ असा प्रवास करत होते. ते सोने तपासणी करण्याचे होलमार्क मशिन खरेदी करण्यासाठी आपल्या जवळील बॅगमध्ये २७ लाख ८६ हजार रोख रक्कम घेउन जात होते. बॅग ठेवून ते बाथरुमध्ये गेले असताना अज्ञाताने त्यांची बॅग लांबवली. बाथरुममधून बाहेर आल्यावर त्यांना आपली बॅग चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली होती.

पोलिस अधिक्षक मोहित कुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रवासादरम्यान सोने व्यापार्‍याची २७ लाख ८६ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लांबवणार्‍या ६ संशयितांच्या सांगलीतून मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. तसेच या कारवाईत शंभर टक्के रोख रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून गुन्ह्यात वापरलेली ५ लाखांची गाडी असा एकूण ३२ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एवढी मोठी रोख रक्कम चोरीच्या गुन्ह्यात शंभर टक्के परत मिळण्याची ही घटना अतिशय दुर्मिळ आहे.

अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे सुरज हसबे, वय २२, मुळ रा.सांगली सध्या रा.केरळ, उमेश सुर्यगंध ३४, अजय शिंदे २१, तुषार शिंदे २२, यश वेदपाठक १९ आणि विकास चंदनशिवे वय २३, सर्व रा.खानापूर,सांगली अशी आहेत. यातील सुरज हसबे हा सोने व्यावसायिक विनोद महिम याचा मावसभाऊ असल्याने, त्याला या व्यवहार आणि प्रवासाबाबत संपूर्ण माहिती होती. त्यावरूनच हे कट कारस्थान रचले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग,अपर पोलिसअधिक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे,शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी,यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी पथकाचे पोलिस उप निरीक्षक शांताराम महाले,पोलिस उप निरीक्षक आकाश साळुंखे,पोलिस हवालदारप्रविणबर्गे,पोलिसनाईकगणेश सावंत, विलास जाधव,सावंत,भालोकर,नार्वेकर यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular