25.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriवाहनांना व्हीआयपी नंबर घेताना, वाहनधारकांच्या खिशाला लागणार कात्री

वाहनांना व्हीआयपी नंबर घेताना, वाहनधारकांच्या खिशाला लागणार कात्री

अगदी कितीही रक्कम मोजायला अनेक वाहनधारक तयार असतात. त्यामुळे मग ‘व्हीआयपी’ नंबरला मागणी जास्त असते.

रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सध्या व्हीआयपी नंबरसाठी चांगलीच मागणी वाढली आहे. अनेकजण आपल्या वाहनचा लकी नंबरसाठी दुप्पट ते तिप्पट रक्कम मोजायला देखील तयार आहेत. काही युनिक वाहन क्रमांकासाठी प्रस्तावित दर दुचाकी व तीनचाकी आणि परिवहन वाहने यांच्या व्यतिरिक्त अडीच लाख रुपये आहे तर दुचाकी व तीनचाकी आणि परिवहन वाहनांसाठी ५० हजार रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे. सध्या त्यासाठी अनुक्रमे दीड लाख रुपये व २० हजार रुपये आकारले जात असल्याची माहिती मिळत आहे.

प्रत्येकाला आपले वाहन अतिशय प्रिय असते. तसा त्याचा नंबरही काहीतरी युनिक असावा यासाठी प्रत्येकजण कायम प्रयत्नशील असतो. अगदी कितीही रक्कम मोजायला अनेक वाहनधारक तयार असतात. त्यामुळे मग ‘व्हीआयपी’ नंबरला मागणी जास्त असते. मात्र आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहनांना व्हीआयपी नंबर घेताना वाहनधारकांच्या खिशाला खड्डा पडणार आहे. याचा अध्यादेश शासनाने काढला असून, पुढील महिन्यापासून चॉईस नंबरसाठी सध्या असलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम मोजावी लागणार आहे.

पसंतीच्या क्रमांकांचे दर कितीही वाढले तरी त्याला मिळणारा प्रतिसाद कमी होत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. काहीवेळा ज्योतिष किंवा अंकशास्त्रांच्या गणितानुसार विशिष्ट क्रमांक हवा असतो तर कधी कधी हौस म्हणूनही पसंतीच्या क्रमांकासाठी लाखो रुपये मोजनारे अवलिया असतात. परंतु आता प्रस्तावित दर अधिकच झाल्याने हौस करणाऱ्यांच्या खिसे रिकामे होणार आहेत.

उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नवीन सीरियल सुरू झाल्यानंतर ‘व्हीआयपी’ क्रमांकासाठी अर्ज घेतले जातात. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव पद्धतीने हे क्रमांक दिले जातात. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने सर्व प्रकारच्या वाहनांची व्हीआयपी अथवा पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. या अधिसूचनेमध्ये निश्चित केलेल्या दरासंदर्भात हरकती नोंदवण्यासाठी राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याची मुदत दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular