31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

रत्नागिरीजवळ अपघात रिक्षाचालकाचा मृत्यू

रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने रिक्षा पलटी होऊन...

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...
HomeRatnagiriएक आगळे वेगळे विलगीकरण केंद्र

एक आगळे वेगळे विलगीकरण केंद्र

कोरोनाच्या संसर्गामुळे आणि शासनाने गृह विलगीकरण बंद केल्याने प्रत्येक गावामध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष निर्माण करण्याचा आदेश प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे. त्यामुळे पंधरावा वित्त आयोग आणि गावातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन अशा प्रकारचे संस्थात्मक विलगीकरण कक्ष निर्माण केले जात आहेत.

रत्नागिरीमधील सावर्डे येथे ग्रामपंचायतीने आम. शेखर निकम यांच्या सहाय्याने एक आगळा वेगळा विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. संस्थात्मक विलगीकरण कक्ष म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये एक संकल्पना ठरलेली असते. विविध आजाराणे ग्रस्त आणि त्रस्त रुग्ण, त्यांची औषधे, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय त्यांच्या फेऱ्या, औषधाच्या वेळा हेच कंटाळवाणे वाटणारे जीवन ते सुद्धा आपल्या माणसांपासून दूर एकटेपणाने राहणे. पण या सर्व कंटाळवाण्या संकल्पनेला फाटा देत आम. शेखर निकम यांनी एकदम हायटेक विलगीकरण निर्माण केला आहे.

एकतर कोरोनाच्या संसर्गामुळे माणूस घाबरून गेलेला असतो, उपचारपद्धती सुरु असली तरी नकारात्मक विचारांनी मन बधीर झालेले असते. त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी आणि मन एकदम सकारात्मक आणि आनंदी राहण्यासाठी आम. निकम यांनी या कक्षामध्ये टीव्ही पासून ते वाचनालयापर्यंतची सोय केली आहे. मन स्थिर आणि आनंदी असले कि, आजारातून लवकर बाहेर पडायला होत अस म्हणतात. सकारात्मक विचारांचा शरीरावरही सकारात्मक परिणाम जाणवतो.

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या आयटीआय कॅम्पस वहाळ फाटा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्ष एकदम अद्यायावर सोयी सुविधांनी परिपूर्ण असून, त्यामध्ये चित्रकलेची आवड असणार्यांसाठी त्याला पूरक व्यवस्था, संगीत ऐकण्याची सोय, वाचनालय, त्याच सोबत मोफत जेवणाची व्यवस्था, स्टीम घेण्यासाठी मशीन, अशा प्रकारच्या सोयी केलेल्या आहेत. प्रांत प्रवीण पवार, तहसीलदार सूर्यवंशी, डीवायएसपी बारी, सरपंच बागवे, आरोग्य अधिकारी यादव यांच्या उपस्थितीमध्ये या विलगीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. .

RELATED ARTICLES

Most Popular