22.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriकौशल्य विकास केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन नाम. सामंत यांच्या हस्ते संपन्न

कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन नाम. सामंत यांच्या हस्ते संपन्न

कौशल्य विकास केंद्रातून स्थानिकांना रोजगार संधी निर्माण होण्यासोबतच स्थानिक अर्थ चक्रास नवीन गती मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्यवसायभिमुख शिक्षणाची सोय कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि मुख्य म्हणजे कोकणामध्ये ज्या गोष्टींचा मुख्य उत्पन्न घेतले जाते, त्याच्याशी आधारित आणि संबंधित व्यवसायभिमुख अभ्यासक्रम सुरु करणे गरजेचे आहे. जसे शेती, मासेमारी, फळप्रक्रिया, या व्यवसायांशी संलग्न व्यवसाय शिक्षण स्थानिक विद्यार्थ्यांना मिळाले तर, भविष्यात कोकणातच अनेक उद्योजक निर्माण होतील.

रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात बांधल्या जाणाऱ्या कौशल्य विकास केंद्रातून स्थानिकांना रोजगार संधी निर्माण होण्यासोबतच स्थानिक अर्थ चक्रास नवीन गती मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. या विकास केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन सामंत यांच्या हस्ते पार पडले. जिल्ह्यात शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे असे सांगून ते म्हणाले की कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात या स्वरुपाचे केंद्र माझ्या खात्यातर्फे उभारण्यात येईल, तसेच दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे गाव असणाऱ्या तासगाव येथे देखील असेच केंद्र उभारले जाणार आहे.

शासकीय तंत्रनिकेतन परिसरात हे केंद्र बांधले जाणार आहे. हे राज्यातील पहिलेच केंद्र असून येथे पुढील ३ वर्षात क्षमतावृध्दी करीत साधारण ३००० विद्यार्थी प्रतिवर्षी हे कौशल्य प्राप्त करायला सुरुवात होईल. सदर इमारतीचे कामकाज येत्या ९ महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे व नंतरच्या काळात प्रतिवर्षी ५ अभ्यासक्रम असे १५ कौशल्य अभ्यासक्रम येथे सुरु करण्यात येणार आहे. स्थानिक ठिकाणची गरज लक्षात घेत येथे पर्यटन,  हॉटेल,  कृषी आणि अन्न अभियांत्रिकी आदि अभ्यासक्रम सुरु होत आहेत. ज्यातून स्थानिक उद्योगास असणारे मनुष्यबळ आणि रोजगार यांची योग्य ती सांगड घातली जाईल.

RELATED ARTICLES

Most Popular