22.4 C
Ratnagiri
Monday, January 30, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriलांजातील “तो” मुख्याध्यापक फरार, ग्रामस्थ आक्रमक

लांजातील “तो” मुख्याध्यापक फरार, ग्रामस्थ आक्रमक

मुख्याध्यापक बराच कालावधी मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते पण आपल्याला शाळेत नापास करतील या भीती पोटी त्या मुलीने इतर कोणाला वाच्यता केली नाही.

लांजा तालुक्यातील गवाणे येथील जिल्हा परिषदेची केंद्र शाळा नं. १ मधील मुख्याध्यापक सोनावणे याने ६ वीत शिकणार्‍या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना २३ एप्रिल या दिवशी उघड झाली. येथील पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाच्या विरोधात ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पीडित मुलीला झालेल्या अत्याचाराविषयी मोठा मानसिक धक्का बसला असल्याने तिला सातत्याने चक्कर येत होती. मुख्याध्यापक बराच कालावधी मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते पण आपल्याला शाळेत नापास करतील या भीती पोटी त्या मुलीने इतर कोणाला वाच्यता केली नाही. पण झालेल्या प्रकाराने घाबरून त्याचा विपरीत परिणाम तिच्या ताब्ब्येतीवर जाणवू लागला. आणि सतत शांत आणि चक्कर येऊन पडू लागली. या विषयी पालकांनी तिला विश्‍वासात घेऊन विचारल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला.

अशा प्रकारे अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. परंतु, यावेळी देखील धैर्य दाखवून त्यांनी मुलीला आधार देऊन, ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने मुख्याध्यापकाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३५४, तसेच बाल लैंगिक अत्याचार (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा नोंद केला.

शिक्षक आणि विद्यार्थी या पवित्र नात्याला काळिमा फासणारी गोष्ट घडल्याने सर्वतर संताप व्यक्त होत आहे. सदरचा मुख्याध्यापक पोलिसांच्या भीतीने कुठेतरी फरार झाला आहे. या अशा घटनांमुळे संपूर्ण शिक्षकी पेशाला डाग लागतो. याविषयी गवाणे गावातील ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडेही तक्रार केली असून आरोपीला लवकरात लवकर शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,  अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मुख्याध्यापकावर कठोर कारवाई न झाल्यास गवाणे येथील जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल’, अशी चेतावणी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. सुरेश करंबेळे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular