27 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriबोगस प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी, रत्नागिरीतील तिघांचा समावेश

बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी, रत्नागिरीतील तिघांचा समावेश

राज्यभरातील ९२ जणांवर बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे विशेष क्रीडा कोट्यातून नोकऱ्‍या मिळाल्याचे निदर्शनास आल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

सरकारी नोकरीसाठी अनेकवेळा बोगस कागदपत्रे जोडून नोकरी मिळवल्याचे प्रकार समोर आलेले आपण पाहतो आहोत. अशाच प्रकारे बनावट प्रमाणपत्र सदर करून नोकरी मिळविण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा विभागातील दोन शिक्षण सेवकांनी प्रयत्न केल्याचे सत्य समोर आले आहे.

राज्य क्रीडा विभागाने वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दोन शिक्षण सेवकांचा समावेश आहे. त्यामध्ये वैशाली म्हस्के, आशिष चव्हाण यांची नावे समोर आली आहेत. अन्य एका शिक्षण सेवकाला रत्नागिरी जिल्हा परिषदेत अद्याप रुजू करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. या तिन्ही शिक्षण सेवकांच्या क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर ते बोगस असल्याचे आढळून आले होते. तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी पार पडलेल्या जिल्हा परिषदेतील एका भरती प्रक्रियेअंतर्गत या तीन खेळाडूंनी बोगस प्रमाणपत्रे सादर केली होती. तत्कालीन सामान्य प्रशासन अधिकारी एस. एस. सावंत यांनी हा प्रकारावर प्रकाश पाडला. त्या प्रमाणपत्रांची विशेष तपासणी करून त्यांच्यावर त्वरित कारवाईसाठी पावले उचलण्यात आली होती.

राज्यभरातील ९२ जणांवर बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे विशेष क्रीडा कोट्यातून नोकऱ्‍या मिळाल्याचे निदर्शनास आल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यातील रत्नागिरी जिल्हा परिषदेतील तीन शिक्षण सेवकांचा समावेश आहे. त्यातील दोघांवर शिक्षण विभागाकडून बडतर्फीची कारवाई झाली असून एकाला नोकरीमध्येच रुजू करून घेण्यात आले नसल्याच्या वृत्ताला प्राथमिक शिक्षण विभागाकडून दुजोरा देण्यात आला आहे.

शासनाकडून जाहीर केलेल्या ९२ जणांच्या यादीत गृह विभागाचे सर्वाधिक कर्मचारी असून, महसूल, नगरविकास, ऊर्जा,  शालेय शिक्षण,  लेखा व कोषागर,  कृषी, सामान्य प्रशासन विभागातही बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकऱ्‍या मिळाल्याचे समोर आले आहे. बोगस क्रीडा प्रमाणपत्र सादर करून सराकरी नोकऱ्‍या मिळवणाऱ्‍या राज्यभरातील अधिकारी व कर्मचाऱ्‍यांवर बडतर्फीच्या कारवाईसाठी शासनाने मोहीम हाती घेतली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular