31.7 C
Ratnagiri
Saturday, April 20, 2024

वाटेला गेलात तर बैठकांमध्ये तमाशा करू – अविनाश जाधव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...

कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांचे वेळापत्रक बिघडले

कोकणरेल्वे मार्गावर गुरूवारी ७ रेल्वेगाड्या विलंबाने धावल्याने...

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी ९ उमेदवार रिंगणात

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या...
HomeRatnagiriरत्नागिरी पोलिसांनी दोन दिवसांत गोव्यातून चोरांच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी पोलिसांनी दोन दिवसांत गोव्यातून चोरांच्या मुसक्या आवळल्या

माग काढताना चोरी करणारे गोव्यातील कळंगुट येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

रत्नागिरी शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. रत्नागिरी बाजारपेठेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एका रात्रीत चार दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. परंतू, दुकानातून चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसले तरी या सर्व घटनांमुळे रत्नागिरी शहरी भागात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यावर दुकानदारांच्या ही गोष्ट निदर्शनास आली आहे. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलीस घटनास्थळी हजर झाले आहेत.

धमालानीचा पार येथील अनिरुद्ध ट्रेडर्स, धनजी नाका येथील नागरवाला जनरल स्टोअर्स, आठवडा बाजार येथील यश ट्रेडर्स आणि यश डीस्ट्रीब्यूटर या दुकानात चोरीच्या घटना घडल्या आहेत. आठवडा बाजार येथील निर्मल रमेश ओसवाल वय ३३, रा. आठवडाबाजार, रत्नागिरी यांचे यश ट्रेडर्स् हे दुकान फोडून चोरट्यांनी ३२ हजार ५०० रुपये चोरून नेले होते. हा प्रकार साधारण २३ ते २४ सप्टेंबर या कालावधी दरम्यान घडला. याबाबत निर्मल ओसवाल यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अधिकच तपास करतना पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन तपास सुरू केला. आणि पोलिसांनी खबऱ्यांच्या मदतीने त्यांचा माग काढण्यास सुरवात केली. ही घरफोडी चार जणांनी केल्याचे निदर्शनास आले होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या चौघांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलली.

यश ट्रेडर्समध्ये चोरी केलेल्या त्या टोळीतील चौघांनी व्यवसायात तोटा झाल्यामुळे झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने चोरीचा मार्ग निवडल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. माग काढताना चोरी करणारे गोव्यातील कळंगुट येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर तातडीने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातील पथक त्यांना पकडण्यासाठी कळंगुट येथे गेले.

कळंगुट पोलिसांच्या सहकार्याने चोरी करणाऱ्या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यात फिरोज इसरार आलम वय ४८, रा. पिंपरखेडा, उत्तर प्रदेश, मोहम्मद सुफियान मोहम्मद अब्बास वय २७, कानपूर, मोहम्मद अझरुद्दीन मोहम्मद हनीफ वय २२, रा. उत्तर प्रदेश आणि एका अल्पवयीन मुलाचा देखील त्यामध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्याची चोरी केल्याचे कबूल केले आणि चोरलेले ३२ हजार ५०० रुपये त्यांच्याकडून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

या विशेष कामगिरीमध्ये शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबरल प्रवीण बर्गे, अमोल भोसले, पंकज पडेलकर, मंदार मोहिते, आशिष भालेकर, दीपराज पाटील यांच्या पथकाने केली. तर सहायक पोलिस फौजदार सुनील चवेकर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular