27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriरत्नागिरीच्या विकासकामासाठी कोटीच्या कोटींमध्ये आश्वासने, महत्त्वाचे विषय मात्र दुर्लक्षित

रत्नागिरीच्या विकासकामासाठी कोटीच्या कोटींमध्ये आश्वासने, महत्त्वाचे विषय मात्र दुर्लक्षित

पऱ्यातून सांडपाणी वाहत असल्याने आणि पऱ्याची स्वच्छता होत नसल्याने हे दूषित, प्रदूषित पाणी ठिकठिकाणी डबक्याच्या स्वरूपात दिसते.

रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र.१, प्रभाग क्र.२ या प्रभागातून वाहणारा पऱ्या आता सांडपाणी सोडण्याची जागा बनली आहे. के. सी. जैननगर, सन्मित्र नगर, फणशी बाग, फगरवठार येथून पुढे जाऊन समुद्राला मिळणारा पऱ्या हा पावसाळ्यात वाहतो. परंतु, आता १२ महिने या पऱ्यात पाणी असते. मात्र हे पाणी खराब सांडपाणी स्वरूपाचे आहे. या पऱ्याच्या भागातील सर्व ड्रेनेज या पऱ्यामध्ये सोडण्यात येत. परिणामी या पऱ्याला दूषित, काळेपाणी सातत्याने डबक्याच्या स्वरूपात पहायला मिळते.

या पऱ्यातून सांडपाणी वाहत असल्याने आणि पऱ्याची स्वच्छता होत नसल्याने हे दूषित, प्रदूषित पाणी ठिकठिकाणी डबक्याच्या स्वरूपात दिसते. या दूषित पाण्यामुळे परिसरातील लगतच्या विहिरींचे पाणी देखील दूषित होऊ लागले आहे. या पऱ्यात सातत्याने दुर्गंधी येत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हैराण आहेत. या डबक्यांमुळे या भागात डासांचे साम्राज्य वाढले आहे. याचा येता जाता त्रास नागरिकांना होतो आहे.

भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले असल्याने, या पऱ्यातील गाळ काढणे, पऱ्याच्या दोन्ही बाजूने कॉंक्रिटीकरण करणे हे अतिशय गरजेचे आहे. सातत्याने परिसरातील नागरिक ही मागणी करत आले आहेत. मात्र आजपर्यंत कोणतेही काम करण्यात आले नाही. रत्नागिरीच्या विकासाकामासाठी कोटीच्या कोटींमध्ये आकडे घोषित होतात. मात्र अत्यंत महत्त्वाचे विषय हे कायमच दुर्लक्षित राहिले आहेत. रत्नागिरीचा सर्वांगीण विकास ही संकल्पना प्रत्यक्षात येताना दिसत नाही. पावसाळ्यापूर्वी हा पऱ्या स्वच्छ करणे, गाळ उपसणे, पऱ्याच्या दोन्ही बाजूंना तात्पुरता तरी भराव टाकून पाणी आजूबाजूच्या परिसरात झिरपणार नाही यासाठी उपाययोजना तातडीने करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular