27 C
Ratnagiri
Monday, May 20, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeRatnagiriतिसर्या लाटेसाठी टास्कफोर्स तयार

तिसर्या लाटेसाठी टास्कफोर्स तयार

रत्नागिरीतील कोरोनाग्रस्तांच्या परिस्थितीमध्ये होणारी लक्षणीय वाढ काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेला मागील वर्षी मार्च महिन्यात सुरुवात झाली, त्यानंतर आलेल्या वेगवान कोरोन लाटेमध्ये अधिक प्रमाणात जीवितहानी झाली. पण एक सकारात्मक बाब ही कि, या महामारीवर लस सुद्धा निर्माण झाली, त्यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी झाले. आणि भारतात या लसीची निर्मिती झाल्याने लसीकरणही वेगवान गतीने सुरु करण्यात आले.

साधारण दिवाळी नंतर कोरोनाची तिसरी लाट येणार असे संकेत दिले गेले आहेत. आणि तिसर्या लाटेचा प्रभाव जास्त करून लहान मुलांवर होताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जिल्ह्यामध्ये ४० बालके कोरोनाबाधित आहेत, त्यांच्यामध्ये विशेष करून तापाची लक्षणे जास्त करून बालकांमध्ये आढळून आली आहेत. ४० पैकी १० जणांमध्ये जास्त तापाची लक्षणे आढळून आली आहेत. कोरोना काळामध्ये प्रसूती झालेल्या मातेसह नवजात बालकांना सुद्धा कोरोना संक्रमण झालेले आढळते, क्वचितच एखादी केस अशी निघेल ज्यामध्ये नवजात शिशुला लागण झालेली नाही.

रत्नागिरी प्रशासनाने तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्कफोर्स निर्माण केली असून, प्रशासन तिसर्या लाटेशी दोन हाथ करण्यास पूर्वनियोजन करून तयार आहे. या टास्कफोर्समध्ये प्रत्येक तालुक्यामधील बालरोगतज्ञ आणि इतर वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात सापडलेल्या संक्रमित ४० बालकांपैकी १० जणांना तापाची लक्षणे जाणवत असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. उर्वरित ३० जणांना काही लक्षणे जाणवत नाहीत, त्यामुळे त्यांना आंबेडकर भवन कुवारबाव विलगीकरण कक्ष येथे निगराणी खाली ठेवण्यात आले आहे.            

RELATED ARTICLES

Most Popular