25.6 C
Ratnagiri
Wednesday, September 18, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeRatnagiriगोष्ट एका unbox ची !

गोष्ट एका unbox ची !

अजूनही ती Excel Sheet अगदी लख्ख आठवते डोळ्यांसमोर. प्रशांत आचार्य, ह्रषिकेश सरपोतदार आणि मी तयार केलेली.

“minimum दहा जरी ऑर्डर पडल्या रोज तरी होऊ शकेल काय रे हे workout?” इथून सुरुवात झालेली एक concept बघता बघता अवघ्या ३६५ दिवसांच्या काळात रत्नागिरीच्या ‍food industry चा अविभाज्य घटक बनली. हे अविश्वसनीय आहे खरंच पण ते सत्यात उतरलं रत्नागिरीकरांच्या प्रतिसादामुळे आणि हॉटेल व्यावसायिकांच्या एक स्थानिक प्रयत्न म्हणून सतत समजून घेत, सांभाळत आम्हाला दिलेल्या ठाम पाठिंब्यामुळे.‌

तर… सांगायचं असं की त्या excel sheet पासून पुढच्या ३० ते ४५ दिवसांत आर्यक सोल्युशन्स् या रत्नागिरीतल्याच आपल्या स्थानिक लोकांच्या कंपनीने UNBOX Your Desire या आपल्या food delivery app ची बांधणी केली. कोकणातलं पहिलंच असं mobile app.

बऱ्याच दिवसांचा, वर्षांचा किराणा माल विक्रीचा अनुभव होताच पण तरीही नव्या संकल्पनेवर काम करायचं डोक्यात होतं. गेल्या वर्षी २०२० ला जेव्हा पहिला लॉकडाऊन संपून पुन्हा पुढचा लॉकडाऊन लागला तेव्हा रत्नागिरीतल्या हॉटेल व्यावसायिकांवर त्याचा tremendous impact झाला. कुटुंबच्या कुटुंब संकटात सापडलेली होती. आजही परिस्थिती तितकीशी बदलली नसली तरी मधल्या काळात मिळालेल्या काही महिन्यांमुळे बरेचसे उद्योग अजूनही तग धरून आहेत. त्याच काळात गेल्या वर्षी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. उदय लोध, प्रसिद्ध स्थानिक हॉटेल व्यावसायिक श्री. सुहास ठाकुरदेसाई, श्री.महेश सावंत, श्री. कौस्तुभ सावंत, माझा अत्यंत जवळचा मित्र आणि आगाशे फूडकोर्टचा सर्वेसर्वा रश्मीन दुर्वे, रत्नागिरीकरांच्या लोकप्रियतेच्या कसोटीवर अनेक वर्ष अग्रेसर असणाऱ्या मिथिला हॉटेलचे श्री. विनोद शानबाग आणि श्री. विवेक शानबाग, श्री. सचिन देसाई या सगळ्यांसमोर ही संकल्पना मांडली. अपेक्षेप्रमाणेच स्थानिक माणसाला सबळ पाठिंबा देण्याची रत्नागिरीची परंपरा कायम राखत सगळ्यांनी unbelievable support केला. मग हळूहळू बऱ्याच हॉटेल व्यावसायिकांना भेटलो, त्यांचाही प्रतिसाद उत्तम होता. हे करायचं असं ठरवलं असलं तरी मनात प्रचंड दडपण होतं.

अखेर तो दिवस उगवला.
७ जून २०२०.

मोजके व्यावसायिक, मोजके delivery boys आणि नेमका हिशोब ठरवून मांडलेलं गणित पहिल्याच, अगदी पहिल्याच दिवशी ४१ ऑर्डरमध्ये बदललं. शब्दांत सांगता येणार नाही इतका हुरुप आला.

आपोआप पुढचं सगळं होतं गेलं. मेहनत करत राहिलो, नियोजन करत राहिलो. पुन्हा मागे वळून पाहावं लागलं नाही. हॉटेलची संख्या वाढत गेली. आज अगदी शहाळ्याच्या पाण्यापासून ते जेवणाच्या भारतीय पदार्थांसह साधारण ७-८ वेगवेगळ्या cuisines च्या availability पर्यंत या आपल्या Unbox Your Desire ची व्याप्ती वाढली आहे. आजच्या घडीला १६८ स्थानिक व्यावसायिक या platform वरून त्यांच्या customers ना समाधानकारक अशी सेवा पुरवतात.
आजची ऑर्डरची वाढती संख्या लक्षात‌ घेता सुमारे २५ लोकं यातील delivery function वर काम करतात.

यातही आणखी भर म्हणून pre oder सुविधा सुरु केली. घरगुती पदार्थांचे व्यावसायिक, इतर सेवा सुविधा पुरवणारे पुरवठादार आणि विक्रेते यांच्या प्रतिसादाने त्यालाही उत्तम यश मिळालं. बरोबरीने online medicines आणि online grocery च्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. आज लोकं घरी बसून prescription च्या एका फोटोवरून आपली औषधं घरपोच मिळवू शकतात.

फक्त व्यवसाय नाही तर यातूनच काहीतरी लोकोपयोगी करण्याचा प्रयत्न म्हणून Zero Hunger Ratnagiri च्या माध्यमातून Food donation cards ची संकल्पना तुमच्या समोर मांडली ज्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलात.

वाढता प्रतिसाद आणि लोकप्रियतेच्या पुढचा टप्पा अर्थातच franchise संबंधी येत जाणाऱ्या विनंती. रत्नागिरीचं मॉडेल पाहून जवळच्या खूप शहरांतून याच्याविषयी चौकशी केली जात होती. परंतु एक वर्षाचा काळ अनुभवल्याशिवाय हे करायचं नाही हे पक्कं ठरवलं होतं. तरीही प्रचंड लोकाग्रहास्तव १ एप्रिल २०२१ रोजी चिपळूणला ३५ हॉटेल व्यावसायिकांसोबत श्री. सौरभ आठल्ये आणि सौ. स्पृहा सौरभ आठल्ये यांनी Unbox Your Desire चिपळूण शाखेचा श्रीगणेशा केला.

या सगळ्यात आमचे अत्यंत चोखंदळ ग्राहक आमच्या पाठीशी होते ज्याशिवाय ७ जून २०२० ते आजपर्यंतचा प्रवास शक्यच नव्हता. अगदी रोज ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांपासून ते अगदी केव्हातरी पण बघूया तरी ऑर्डर करून म्हणून आमच्या Unbox Your Desire शी जोडल्या गेलेल्या प्रत्येक ग्राहकाचे आम्ही ऋणी आहे.

#vocalaboutlocal आणि #आत्मनिर्भरभारत हे नुसते सोशल मिडीयावरचे ट्रेंड नाहीत तर बदलणाऱ्या भारताची आशादायी चित्रच आहेत याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपलं UNBOX Your Desire. आज कुठल्याही मोठ्या कंपनीच्या फूड डिलीव्हरी अॅपच्या तोडीसतोड ट्रॅकिंग प्रणालीसह कार्यरत असणारं Unbox Your Desire हे आपलं app तुम्हा रत्नागिरीकरांच्या प्रतिसादाचं फलित आहे.

या सगळ्याव्यतिरिक्त आमचा ऑफिस स्टाफ आणि delivery team यांच्या अथक परिश्रमांतून हे शक्य होत गेलं. मी एकटा सगळं करूच शकत नाही. हे लोकं आहेत म्हणून आज लोकांना गौरांग आगाशे हे नाव माहिती आहे हे मी प्रांजळपणे मान्य करू इच्छितो या निमित्ताने.

UNBOX your desire च्या सेवेशी आणि नावाशी जोडल्या गेलेल्या दर्जा तसंच यशाचं मुख्य कारण ठरलेले ऑफीस टीम (accounts, monitoring) म्हणजे तृप्ती माचकर, मनिषा नांदगावकर, सुमन मौदी आणि आमचे डिलीव्हरी बॉईज् हसन अद्राणी, गौरव देसाई, संकेत गोरे, अमित कंकण वाडी, मंगेश चाळके, सिद्धेश वाडेकर, हर्षल सावंत, विशाल पवार, श्रीधर बने, पराग साळुंखे, मनिष घवाळी, निखिल बारगोडे, संस्कार भोसले, अक्षय गोरीवले, किरण भरवडे, पवन झाडगावकर , सार्थक गुरव, रितेश लोखंडे, प्रथमेश लाखण, शार्दुल भुवड, अश्वजित सावंत ,संकेत गावडे ,निखिल गोडावे या सगळ्यांमुळेच आम्ही इथवर आलो आहोत.

आर्यक सोल्युशनची संपूर्ण टीम, आमचे कर सल्लागार श्री.शरद वझे व सौ गायत्री वझे आमच्या जाहिरातींमधून लोकांसमोर यायला राजी होणारे सगळे कलाकार, सोशल मिडीया टीम, कॅमेरा टीम, संकलन टीम, लेखन करणारे व्यक्ती, फोटोग्राफर्स, जाहिरातीकरिता उत्तमोत्तम डिझाईन्स देणारे नामांकित लोकं यांच्या कधीही न संपणाऱ्या उत्साहामुळे आणि सहभागामुळे ही गाडी इथवर आली आहे. आर्यक सोल्युशन्सचे श्री. केतन काटदरे आणि श्री. श्रेयस सावंत, डिजिटल सोशल मीडिया टीम- दृश्यम कमिन्यूकेशन्स् ची सायली खेडेकर, लेखन करणारे  कौस्तुभ अरुण आठल्ये, मॅक design अँड प्रिंट चे श्री. उदय पाटणकर, विडिओ अँड फोटो मागचे किमयागार परेश राजीवले ,मयुर दळी आणि टीम, ध्वनिमुद्रणाच्या प्रत्येक कामात सहकार्य करणारा आमचा उदय दादा म्हणजे श्री. उदयराज सावंत, विडिओ ऍड आर्टिस्ट माझे मित्र श्री. श्रमेश बेटकर आणि श्री. प्रथमेश शिवलकर, पार्श्वसंगीतामागील कलाकार श्री. गणेश घाणेकर आणि श्री. राजू किल्लेकर आणि आपल्या Unbox Your Desire ची musical tune बनवणारी, रत्नागिरीच्या संगीत क्षेत्रातलं तसं नवं पण अतिशय गुणी नाव म्हणजे राधिका भिडे, या सगळ्यांचे विशेष आभार. तुमची साथ यापुढेही कायम लागणार आहे.

यापुढचा Unbox Your Desire चा प्रवास देखील असाच मजलदरमजल करीत यशस्वीपणे सुरु राहिल असा विश्वास वाटतो.

हे सगळं करताना, वर्षं लोटल्यावर आजही त्या दिवशीची मनाची अवस्था आठवून एक गाणं सारखं सारखं आठवत राहतं…

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटी लडाई
अन् हत्याराचं फुलावानि घाव बी खाई
गळ्यामंदी पडलं त्येच्या माळ इजयाची…
तू चाल पुढं…! 🙂

– UNBOX TEAM, RATNAGIRI

RELATED ARTICLES

Most Popular