27.9 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

जिल्ह्यातील ६०० ठेकेदारांची ८०० कोटी रूपयांची बिले थकली

राज्यातील सर्व विभागाकडील कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता,...

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...
HomeRatnagiriआंतरजिल्हा बदलीसाठी सव्वातीनशे शिक्षकांनी केला अर्ज

आंतरजिल्हा बदलीसाठी सव्वातीनशे शिक्षकांनी केला अर्ज

मागील दोन वर्ष कोविड महामारीच्या काळामुळे आणि नंतर तांत्रिक कारणासह अन्य कारणास्तव ही प्रणाली कार्यरत होण्यासाठी काही विलंब झाला होता.

प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या प्रकरण बरेच महिने गाजत आहे. सध्या हि प्रक्रिया ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण करण्यात आले आहे. मागील दोन वर्ष कोविड महामारीच्या काळामुळे आणि नंतर तांत्रिक कारणासह अन्य कारणास्तव ही प्रणाली कार्यरत होण्यासाठी काही विलंब झाला होता. गेल्या काही दिवसात पुन्हा ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुकांनी ९ ऑगस्टपर्यंत अर्ज भरावयाची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर पुढील चार दिवसात बदलीचे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.

परजिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नोकरीसाठी आलेल्या शिक्षकांचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी शेकडो अर्ज शिक्षण विभागाकडे येत असतात. तीन ते पाच वर्षे पूर्ण झालेल्यांना आंतरजिल्हा बदलीने जाण्यास अर्ज करण्याची संधी मिळते. परंतु, शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या देखील दहा टक्केपेक्षा अधिक असल्यामुळे आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. त्यामुळे अनेक शिक्षकांना गावाकडे नोकरीसाठी जाणे शक्य होऊ शकले नाही.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सव्वातीनशे शिक्षकांनी पोर्टलवर अर्ज भरले आहेत. बदलीसाठी अर्ज भरण्याची मंगळवारी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. १३ तारखेपर्यंत बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.  बदली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्याने आंतरजिल्हा बदली होऊन जाण्यासाठी इच्छुक शिक्षकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. इच्छुक शिक्षकांना ऑनलाइन अर्ज भरून ठेवण्यासाठी शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत परजिल्ह्यात जाण्यासाठी सव्वातीनशे शिक्षकांनी ऑनलाइन प्रस्ताव केले असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

सध्या शिक्षकांची रिक्त पदे १७ टक्केपेक्षा अधिक आहेत. नव्याने भरतीही केली गेलेली नाही. त्यामुळे या परिस्थितीत आंतरजिल्हा बदलीने पात्र शिक्षकांना सोडण्यात आले तर रिक्त पदांमध्ये अधिकच वाढ होणार असल्याने,  शिक्षण विभागाकडून कळवण्यात आले आहे कि, बदलीसाठी शिक्षक पात्र ठरले तरीही त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी जाण्यास त्वरित परवानगी दिली जाणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular