26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriप्रौढाची ट्रॅव्हल कंपनीकडून  लाखो रुपयांची फसवणूक, तक्रार दाखल

प्रौढाची ट्रॅव्हल कंपनीकडून  लाखो रुपयांची फसवणूक, तक्रार दाखल

काही दिवसांनी मेंबरशीप व स्किमचा फायदा घेण्यासाठी सदर कंपनीने दिलेल्या फोन नंबरला व हेल्पलाईन नंबरला चंद्रशेखर यांनी कॉल करण्याचा प्रयत्न केला.

रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील प्रौढाची ट्रॅव्हल कंपनीकडून फिरायला जाण्याचे पॅकेज देवून १,००,००० रुपये इतकी रक्कम घेत फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संबंधित कंपनीकडून आलेल्या प्रतिनिधीबाबत प्रशांत व १० ते १२ लोक यांच्यावर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ मे रोजी दुपारी १ वाजता हॉटेल कोहीनूर बीच रिसॉर्ट मध्ये घडली.

डी.एस. चंद्रशेखर वय ५२, रा. शिवाजीनगर यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून वास्कॉन रिअर इस्टेट ऍण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या सेमिनारमध्ये प्रशांत व १० ते १२ यांनी देशामध्ये फिरण्याची माहिती दिली. त्यामध्ये ६ रात्रौ ७ दिवस वर्षातून एकदा फिरण्यासाठी माहिती देत सदर स्किम देत सदरच्या स्किमची मेंबरशीपसाठी चंद्रशेखर यांच्याकडून कंपनीच्या खात्यावर १,००,००० लाख भरायला सांगितले व मेंबरशीप देण्यात आली.

परंतु काही दिवसांनी मेंबरशीप व स्किमचा फायदा घेण्यासाठी सदर कंपनीने दिलेल्या फोन नंबरला व हेल्पलाईन नंबरला चंद्रशेखर यांनी कॉल करण्याचा प्रयत्न केला. त्या दोन्ही नंबरशी संपर्क केला असता, कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर शनिवारी रात्री उशीरा शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

हल्ली अशा फसवणुकीच्या प्रकारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असलेली दिसून येत आहे. विशेष करून यामध्ये तरुणाई आणि वृद्ध माणसांना टार्गेट केले जात असलायचे निदर्शनास आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular